शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात नगराध्यक्ष बदलाची चर्चाच

By admin | Updated: March 23, 2016 00:46 IST

संजयकाकांशी बोलणार कोण? : नगरसेवकांना होईना धाडस, विषय प्रलंबित

तासगाव : तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा तीन महिन्यांचा नगराध्यक्षपदाचा कालावधी संपल्यानंतर, नगराध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग आला होता. नगराध्यक्ष बदलासाठी काही नगरसेवकांनी एकत्रित येत मोर्चेबांधणी केली. मात्र खासदार संजयकाकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोणत्या नगरसेवकाने पुढाकार घ्यायचा? या भीतीने नगराध्यक्ष बदलाचा विषय खासदारांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष बदलाची केवळ चर्चाच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.तासगाव पालिकेत संजयकाका गटाची सत्ता आल्यानंतर पहिल्या टप्प्यात सुशिला साळुंखे यांना दोन महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांचा तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. आठ नगरसेवकांनी एकत्रित बैठक घेऊन नगराध्यक्ष बदलासाठी खासदार संजयकाकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. संजयकाका दिल्लीहून आल्यानंतर सोमवारी तासगाव शहरातील सर्व प्रभागात विविध विकासकामांचे नारळ फुटले. यावेळी काका गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. मात्र दिवसभरात एकाही नगरसेवकाने नगराध्यक्ष बदलाबाबतची चर्चा खासदारांशी केली नाही. नेमकी चर्चा कोणी करायची? याबाबत नगरसेवकांत एकमत झाले नाही. चर्चा केली आणि त्याला संजयकाकांचा विरोध असला, तर रोषाचे धनी कोणी व्हायचे? असा प्रश्न उपस्थित करीत नगराध्यक्ष बदलासाठी आग्रही असलेल्या सर्वच नगरसेवकांनी मौन धारण केले. त्यामुळे संजयकाका आल्यानंतर नगराध्यक्ष बदलाबाबत मागणी करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला असून, त्याची केवळ चर्चाच राहिली आहे. (वार्ताहर)नगराध्यक्ष बदलाचा निर्णय लांबणीवर खासदार संजय पाटील दिल्लीहून आल्यानंतर नगराध्यक्ष बदलाबाबत मागणी करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला असून, त्याची केवळ चर्चाच राहिली आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. आठ नगरसेवकांनी एकत्रित बैठक घेऊन नगराध्यक्ष बदलासाठी खासदार संजयकाकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांनी त्याबाबत कोणतीही मागणी केली नाही.