सर्वत्र वाळू उपसा बंद असल्याने वाळूला मोठी मागणी असून चांगली किंमतही मिळत आहे. बोलवाड येथील ओढापात्र मोठा असल्याने येथे वाळूही मोठ्या प्रमाणात आहे. काही माजी पदाधिकारी व नेतेमंडळी यांनी येथील ओढापात्रातील सुमारे सातशे ते आठशे ब्रास वाळू अवैधरीत्या उपसा करून विक्री केली आहे. वाळूचा साठा एका पदाधिकाऱ्याच्या शेतात केल्याचा आरोप सरपंच पाटील यांनी केला आहे. रात्रीच्यावेळी वाळू उपसा करण्यात येत आहे. वाळू उपसा करण्यास अटकाव करणाऱ्यांना त्यांच्याकडून दमदाटी करण्यात येत आहे. यामध्ये गुंतलेल्यांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. अतोनात वाळू उपसा होत असल्याने ओढा पाण्याने तुडुंब भरल्यास ओढ्याशेजारील शेतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बोलवाड येथील ओढापात्रातील अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच पाटील यांनी केली आहे.
बोलवाड ओढापात्रातील वाळू उपसाप्रकरणी कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST