शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगावच्या गणपती पंचायतन ट्रस्टीवर कारवाई करा

By अशोक डोंबाळे | Updated: May 14, 2024 14:33 IST

किसान सभेची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी : कराराने जमिनी देण्याचा लिलाव त्वरित रद्द करा

सांगली : तासगाव येथील गणपती पंचायतन ट्रस्टची हजारो एकर जमीन जिल्ह्याच्या विविध भागांत आहे. या जमिनींचा ट्रस्टीने ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणून ट्रस्टीचा जमीन लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.किसान सभेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थान विलीन झाली; पण खासगी मालकी आहे तशीच राहिली. त्यामुळे जिल्ह्यातील संस्थानिकांनी त्यांच्याकडे असणारी जमीन ट्रस्ट ॲक्टखाली नोंद करून शेतकऱ्यांना खंडाने दिली. सध्या या ट्रस्टींनी शेतकऱ्यांकडील जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे सात-बारा उताऱ्यावर देवस्थान इनाम वर्ग तीन अशी नोंद झाली. आजही तशी नोंद आहे. खंडकऱ्या शेतकऱ्यांची नावे संरक्षित कूळ म्हणून इतर हक्कात होती. पाठीमागील दोन वर्षांपासून सदर नावे कमी केली आहेत. उताऱ्यावर कोणत्याही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर नाहीत. शेतकऱ्यांची नावे कमी झाल्याचा फायदा ट्रस्टींनी घेतला आहे. तसेच या जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. असे झाले तर वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून आम्ही मागणी करतो की सदर जमिनीचा लिलाव जाहीर करणाऱ्या ट्रस्टीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तसेच सध्याची लिलाव प्रक्रिया रद्द करून कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्ववत सात-बारा उताऱ्यावर नोंद झाली पाहिजे, या मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, सचिव गुलाब मुलाणी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी भूमिहीन होतील : उमेश देशमुखशेतकऱ्यांकडे संस्थानच्या नावे असणाऱ्या जमिनीचे लिलाव करून ९९ वर्षांने दिले तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून शासनाने यामध्ये लक्ष घालून बेकायदेशीर लिलाव रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उमेश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी