शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

कोयना, चांदोलीमध्ये वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र, ताडोबाचे वाघ आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 17:46 IST

: कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि कात्रज येथून सांबर व चितळ आणून सोडली जातील. हरीणांची पैदास वाढल्यानंतर ताडोबामधून वाघ आणून सोडले जाणार आहेत.

ठळक मुद्देकोयना, चांदोलीमध्ये वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र, ताडोबाचे वाघ आणणार, पाहुण्यांना चांदोली, कोयना मानवणार का?

संतोष भिसेसांगली : कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि कात्रज येथून सांबर व चितळ आणून सोडली जातील. हरीणांची पैदास वाढल्यानंतर ताडोबामधून वाघ आणून सोडले जाणार आहेत.वन्यजीव संवर्धन आराखड्यानुसार राज्यात वाघांचे अधिवास क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. सध्या ताडोबा वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त वाघ नोंदवले गेलेत. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही संख्या वाढली आहे. जंगलक्षेत्रातील वाघ मानवी वस्तीत शिरल्याने रहिवासी त्रस्त आहेत, शिवाय जिवितहानीही होत आहे. त्यामुळे वाघांचा समतोल राखण्यो नियोजन आहे. अतिरिक्त वाघांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे.पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यापूर्वीच घोषित झाला आहे. कोयना आणि चांदोलीचे जंगल त्याअंतर्गत येते. सध्या येथे बिबटे भरपूर आहेत, वाघ मात्र एखादाच आहे. वाघ वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी कात्रजमधून ४० हून अधिक हरणे आणली होती. झोळंबी क्षेत्रात डीअर पार्क तयार केला होता. काही दिवसांनी हरणे जंगलक्षेत्रात सोडली, पण पैदास वाढली की नाही हे मात्र निश्चित नाही. सोलापूरच्या प्राणीसंग्रहालयातून जास्त झालेले काळवीट आणण्याचे नियोजन प्राधिकरणाच्या नकारामुळे प्रत्यक्षात आले नाही.पाहुण्यांना चांदोली, कोयना मानवणार का?डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून वाघांच्या पुनर्वसनाचा अभ्यास चार वर्षांपासून सुरु आहे. वाघांचा वावर, सुरक्षितता, खाद्याची उपलब्धता, भविष्यात पैदास होण्यासाठी अनुकुलता, मानवी वस्तीपासून अंतर, शिकारीचे धोके या सर्व बाबींचा अभ्यास सुरु आहे. ताडोबाच्या हवामानातील वाघांना चांदोली, कोयना मानवेल काय? याचाही अदमास घेतला जात आहे. अभ्यास अंतिम टप्प्यात असून संस्थेने हिरवा दाखवल्यानंतर नवे पाहुणे चांदोली, कोयनेत रुजू होतील. पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद घेता येईल.चांदोलीत स्थानिक वाघ नाहीचांदोलीत एखादाच व कोयनेत तीन ते चार वाघ आढळले आहेत, पण ते स्थानिक रहिवासी नाहीत. चांदोली, कोयना, दाजीपूर-राधानगरी, तिलारी हा त्यांचा कॅरीडॉर आहे. ताडोबातून आणलेले वाघही या कॅरीडॉरमध्ये फिरल्यास जास्त संख्येमुळे मानवी वस्त्यांत शिरण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली. अर्थात ३१७ चौकिमीच्या चांदोलीमध्ये पुरेसे खाद्य मिळाल्यास ते अन्यत्र भटकणार नाहीत असाही अंदाज आहे.

टॅग्स :TigerवाघSangliसांगली