शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'कडून सांगली-पेठ रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण, ..तर अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा दिला इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: November 5, 2022 18:17 IST

रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था

सांगली : सांगली ते पेठ रस्ता आता रहदारीसाठी राहिलेला नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. रस्ता तत्काळ झाला नाही तर अधिकाऱ्यांना कोंडून घालू, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, अरुण कवठेकर, तानाजी साठे, भरत पाटील, प्रभाकर पाटील, राम पाटील, काशिनाथ निंबाळकर, अभय मंजुगडे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.महेश खराडे म्हणाले की, सांगली ते पेठ रस्ता दर्जेदार करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी आहे. सांगली शहरातील नागरिकांनी या रस्त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेही केली आहेत. तरीही या रस्त्याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहे. खराब रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक महिलांची रस्त्यातच प्रसूती झाली आहे. रस्त्याचे काम उत्कृष्ट होत नाही, केवळ डागडुजी केली जाते. लोकांचा वेळ, पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अधिकाऱ्यांनी वाद थांबवून रस्त्याचे काम करावे : महेश खराडेसांगली ते पेठ रस्ता राज्य शासनाकडे की केंद्राच्या हायवे प्राधिकरणाकडे आहे या वादात रस्त्याचे काम रखडले आहे. अधिकाऱ्यांच्या या वादात सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे गांभीर्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यापुढे या रस्त्यावर अपघातात कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही महेश खराडे यांनी दिला आहे

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूक