शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे नागरिकांत संशयकल्लोळ

By अविनाश कोळी | Updated: April 15, 2024 19:28 IST

नागरिकांना शंका का येतेय?

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून खासगी संस्थेमार्फत मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. महापालिकेने याबाबतची माहिती जाहीर न केल्यामुळे, तसेच कंपनी प्रतिनिधींसमवेत महापालिका कर्मचारी नसल्याने नागरिकांतून या सर्वेक्षणावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने योग्य ती माहिती जाहीर करून महापालिकेचे कर्मचारी सोबत द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.महापालिका क्षेत्रातील कराच्या कक्षेतून सुटलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. ड्रोनद्वारे यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. आता ड्रोनच्या सर्वेक्षणानुसार पडताळणी करण्यासाठी खासगी संस्था नियुक्त करण्यात आली आहे. या संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मोजमाप घेऊ पाहत आहेत. मात्र, अनेक नागरिकांनी त्यांना झिडकारले. सर्वेक्षणाबाबत नागरिकांना कोणतीही माहिती नाही. महापालिकेने त्याबाबत सूचनाही दिली नाही. त्यामुळे सर्वेक्षण करणारे खरे आहेत की कोणी फसविणारे लोक आहेत, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. अनेक नागरिकांनी सर्वेक्षणास नकार देत कर्मचाऱ्यांना पिटाळले आहे.

नागरिकांना शंका का येतेय?विविध कंपन्यांच्या ऑफर घेऊन किंवा मदत मागण्याच्या बहाण्याने अनेकदा फसवणुकीचे प्रकार सांगली, मिरजेत घडले आहेत. अशातच अनोळखी संस्था व त्यांचे प्रतिनिधी थेट घराच्या आत जाऊन माेजमाप घेणार असल्याने नागरिकांना त्यावर विश्वास बसत नाही. महापालिकेने नागरिकांना याबाबतीत कोणतेही आवाहन केलेले नाही.

सर्वेक्षण कशाबद्दल होत आहे?महापालिका क्षेत्रात अनेक घरे, दुकाने व अन्य मालमत्तांची नाेंद कर विभागाकडे नाही. त्यामुळे महापालिकेचा कर बुडविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा मालमत्तांचा शोध घेऊन कर आकारणी करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्णमहापालिकेच्या अंदाजानुसार करचुकवेगिरी करणाऱ्या एकूण ५० हजार मालमत्ता या सर्वेक्षणातून समोर येणार आहेत. याशिवाय वाढीव बांधकाम करूनही त्याची नोंद न केलेल्या मालमत्ताही सापडणार आहेत. याबाबतची प्राथमिक तपासणी ड्रोनद्वारे केली आहे.

सर्वेक्षण करणाऱ्या खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र आहेत, मात्र महापालिकेचे अधिकृत कोणी कर्मचारी नसल्यामुळे नागरिक शंका व्यक्त करीत आहेत. सध्या सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने फसवणारे अथवा चोरीच्या उद्देशाने फिरणारे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वेक्षण करताना महापालिकेचे अधिकृत कर्मचारी उपस्थित असावेत. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली

टॅग्स :Sangliसांगली