शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

‘त्या’ शिक्षक पती-पत्नीचे निलंबन

By admin | Updated: April 8, 2015 00:32 IST

सीईओंचे आदेश : एकत्रिकरणाचे ९० टक्के प्रस्ताव बोगस

सांगली : अन्य जिल्ह्यातून सांगली जिल्हा परिषदेकडे येण्यासाठी पती-पत्नी एकत्रिकरणाचे प्राथमिक शिक्षण विभागाकडे दाखल १७ प्रस्तावांमध्ये त्रुटी दिसून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रस्तावांपैकी १२ प्रस्तावांचे अहवाल आले असून, त्यामध्ये ९० टक्के बोगस आढळून आले आहेत. शिक्षकांनी शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवून संबंधितांवर निलंबनाच्या कारवाईसह फौजदारीचा प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदांना पाठविण्याची सूचना त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यात नोकरीस असणारे शिक्षक सांगली जिल्ह्यात येण्यास इच्छुक आहे. येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे जिल्हा परिषद सांगली येथील प्रशासनाने सेवाज्येष्ठता यादी तयार केली होती. या यादीवर हरकती घेताना काही शिक्षकांनी पती-पत्नीचे बोगस प्रस्ताव असल्याची तक्रार केली होती. ज्येष्ठता यादीत आपल्या नावाचा समावेश होत नसल्याचे पाहून काहींनी खासगी पतसंस्था, विकास सोसायट्या, खासगी अन्य सहकारी संस्थांमध्ये पत्नी नोकरीला असल्याचे बोगस दाखले दिले होते. काहींच्या पतीचे बोगस दाखले आढळून आले आहेत. अशापध्दतीचे १७ प्रस्ताव बोगस आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सतीश लोखंडे यांनी बोगस दाखल्यांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागातील पथकांची नियुक्ती केली होती. चौकशी अधिकाऱ्यांनी १२ प्रस्तावांचा अहवाल जिल्हा परिषदेकडे मंगळवारी सादर केला आहे. बोगसगिरीने लोखंडे चांगलेच संतापले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सर्व शिक्षकांवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव करून फौजदारी गुन्हेही दाखल करावेत. तसा अहवाल संबंधित जिल्हा परिषदांना ९ एप्रिलपर्यंत पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)बावीस प्रस्तावांमध्येही गोलमालपती-पत्नी एकत्रिकरणासाठीच अन्य जिल्ह्यातील बावीस शिक्षकांनी पत्नी खासगी शिक्षण संस्थेत नोकरीला असल्याचे दाखले जोडले होते. या प्रकरणाची संबंधित शिक्षण संस्थेला भेट देऊन पाहणी केली असता नेमणूक, पगार होत नसल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारचे तीन ते चार प्रस्ताव प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.