शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जयंती-पुण्यतिथी बनतायेत जगण्याचा उद्योग

By admin | Updated: March 29, 2016 00:08 IST

वर्गणीसाठी तगादा : आटपाडीत अधिकारी, व्यापाऱ्यांना नाहक त्रास

आटपाडी : अलीकडे कोणत्याही महापुरुषाची जयंती जवळ आली की, व्यापारी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा उभा रहात आहे. कार्यकर्त्यांच्या ‘टोळ्या’(?) करून वर्गणी गोळा करायची आणि एक मिरवणूक, थोडीफार रोेषणाई करून वर्गणीवर डल्ला मारायचा, असा अनेकांचा फंडा झाला आहे. काहीजणांचा तर वर्षभर जगण्याचा उद्योगच झाला आहे.सदैव दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या आटपाडीत महापुरुषांच्या जयंत्या मात्र अलीकडे मोठ्या उत्साहात ‘संपन्न’ होताना दिसत आहेत. महापुरुषांच्या विचारांऐवजी त्यांचा उत्सव साजरा करण्यामध्ये अनेक मंडळींना अधिक रस वाटतोय. जयंती उत्सवाच्या नावाखाली वर्गणीची पावती पुस्तके छापून टोळकी-टोळकी एकत्र येऊन दंडेलशाहीने वर्गणी गोळा करतात. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन मनमानी रक्कम पावतीवर लिहून पावती फाडून ती अधिकाऱ्यांकडे देतात. वर्गणी द्या नाही तर तुमच्या कार्यालयाविरुद्ध आंदोलन करण्याचा दमही काहीवेळा दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत.एवढी वर्गणी जमा करून ही मंडळी त्याचे काय करणार आहेत, याबाबत कुणाला विचारायची सोय नसते. या पैशाचं ते काय करतात ते ही कळायला मार्ग नाही. केवळ मिरवणूक, एखादा कार्यक्रम, मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचणारे काही तरुण एवढ्या उत्सवासाठी मोठ्या वर्गणीची गरज का लागते, हे आटपाडीकरांना न सुटलेले कोडे आहे. उत्सव साजरा करणाऱ्या किती मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आहे, हा चौकशीचाच भाग आहे. या सगळ्या खाबूगिरीत दुष्काळी परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांवर परिणाम झाल्याने आर्थिक संकटात सापडलेले व्यापारी आणि प्रामाणिक अधिकारी यांचे मात्र हाल होत आहेत. (वार्ताहर)वर्गणी नव्हे, खंडणी..!गणेशोत्सवात सर्व मंडळांना पोलिस परवानगी देतानाच सक्तीने वर्गणी घेतली, तर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारावजा सूचना देतात. अलीकडे महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळींबाबतही पोलिसांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. महापुरुषांची जयंती साजरी करणारी मंडळे अधिकृत आहेत काय? ते वर्गणीच्या खर्चाच्या तपशिलांचे आॅडिट करून घेतात काय? यासह सर्व कायदेशीर बाबींची सक्त तपासणी होणे गरजेचे आहे.