शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश खाडेंच्या मंत्रीपदी निवडीने मिरजेत जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:00 IST

मिरज : आ. सुरेश खाडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर रविवारी मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, त्यांच्या ...

मिरज : आ. सुरेश खाडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर रविवारी मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, त्यांच्या निवडीचे स्वागत केले. श्रीकांत चौकात कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करीत जल्लोष केला. खाडे यांचे मिरजेत आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.मंत्री म्हणून शपथविधीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून शनिवारी दुपारी निमंत्रण मिळाल्यानंतर खाडे कुटुंबीयांसह मुंबईला रवाना झाले. शपथविधीस उपस्थित राहण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच व भाजप पदाधिकारी, कार्यकर्तेही मुंबईला गेले होते. आ. खाडे यांची राज्यमंत्री, की कॅबिनेट मंत्रीपदी निवड होणार, याबाबत उत्सुकता होती. रविवारी सकाळी खाडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणता विभाग मिळणार, याची चर्चा सुरू होती.श्रीकांत चौकात भाजपचे ओंकार शुक्ल, जयगोंड कोरे, ओंकार शुक्ल, चंद्रकांत मैगुरे, ऋषिकेश कुलकर्णी, भैया खाडिलकर, भाऊसाहेब नरोटे, सुनील कुलकर्णी, राम भंडारे, श्याम भंडारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप केले. गत विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षात अनेकदा भाऊंना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीपदाला खाडे यांनी गवसणी घातल्याने भाजप कार्यकर्त्यांना आनंद झाला.गेल्या पाच वर्षात मिरज मतदार संघात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका व लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळविले आहे. गत महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांचा विकास कामांसाठी निधी मिळण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. मात्र खाडे यांना मंत्रीपद मिळाल्याने आयात नगरसेवकांचा बंडाचा पवित्रा आता थंड होणार आहे. सुमारे ५० वर्षांनंतर मिरजेला प्रथमच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने खाडे यांचे जोरदार स्वागत होणार आहे. मुंबईत अधिवेशनास उपस्थित राहून पुढील आठवड्यात मिरजेत आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढण्याची तयारी केली आहे.