लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : राष्ट्रवादीच्या आटपाडी तालुका युवक अध्यक्षपदी सूरज रावसाहेब पाटील यांची फेर निवड केली. तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस आटपाडी तालुका अध्यक्षपदी अश्विनी कासार - अष्टेकर तर युवती तालुका अध्यक्षपदी अक्षया बळीराम माने, युवती जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी दीपाली भिमराव मंडले यांची निवड केली. या निवडी सांगली येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात घोषित करण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निरीक्षक भारती शेवाळे, युवकचे निरीक्षक आसबे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुष्मिताताई जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड्. बाबासाहेब मुळीक, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, युवती जिल्हाध्यक्ष पूजा लाड, खानापूर -आटपाडी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख आदी उपस्थित होते.