शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा @ महाबळेश्वर

By admin | Updated: May 29, 2017 23:12 IST

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा @ महाबळेश्वर

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून जग प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तसेच महाराष्ट्राची चेरापूंजी व नंदनवन म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या तिन्ही ऋतूंचा म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असा निसर्ग सध्या पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये अनुभवयाला मिळत आहे. त्यामुळे महाबळेश्वर हे सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेले आहेमहाबळेश्वर हे पर्यटकांचे पर्यटन स्थळ हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. सध्या महाबळेश्वरमध्ये बारमाही हंगाम भरत आहे आणि विकेंडला तर हाऊस फुल गर्दी होत आहे. या हंगामात अनेकवेळा पर्यटकाना नो टॅक्सी व नो रूम याचा ही सामना करावा लागला. अनेक पर्यटकांनी वाई परिसरात मुक्काम ठोकला; परंतु पर्यटकांचा मुख्य हंगाम म्हणजे एप्रिल-मे आणि जून असून येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दरवर्षी वाढतच चाललेली आहे. कडक उन्हात पावसाचे वातावरण निर्माण होऊन पाऊस पडत आहे. तसेच या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांबरोबर स्थानिक नागरिकांनीही लुटला आहे. रात्रीच्या वेळी दाट धुके सगळीकडे पसरत आहे. त्यातच थंडगार वारेही वाहत असल्याने गारवा पडत आहे. पर्यटक दाट धुक्याचा व थंडीचा आंनदही घेत आहेत. चालू मे महिन्यात हे कितीतरी वेळा वातावरण पाहावयास मिळत आहे. अशा निसर्ग सौदर्याला वर्षाराणीने न्हाऊ घातल्याने वातावरणात चांगलाच बदल घडून आला आहे. महाबळेश्वरची खासीयत व पर्यटकांना आकर्षित करणारी येथील स्ट्रॉबेरी, चन्ना, जाम, चिक्की, गर्मीचे कपडे, शोभेच्या वस्तू, अशा ऐकापेक्षा एक वस्तूंनी पर्यटक भारावून जातो व या वस्तूंची पर्यटकांमधून मोठी मागणी असल्याने बाजारपेठ या भरभरुन गेल्या आहेत. तसेच पर्यटकसुध्दा या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत.कौटुंबिक सहल तसेच मुंबई, पुणे, गुजरात या ठिकाणाहून पर्यटक ट्रॅव्हल एजंटकडून सोईस्कर पॅकेज काढून अनेक पर्यटक मंडळी मनमुराद आनंद लुटण्यासाठी आली आहेत. वनविभागाकडून ठराविक प्रेक्षणीय स्थळे, पॉर्इंटची डागडुजी केली गेली असल्यामुळे पर्यटकांना याचे खास आकर्षण झाले आहे तसेच सायंकाळच्या वेळेस वेण्णा लेक येथील बोटिंग व तेथील स्वादिष्ट गरमागरम मक्का कणीस, स्ट्रॉबेरी, क्रीम, ज्यूस तसेच मुख्य बाजारपेठेत खरेदी व फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत पर्यटकांची येथे रात्री उशीरापर्यंत गर्दी होत आहे.