विटा शहरात सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त होता. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. भाजी मंडई पूर्णपणे बंद होती. औषधे, दूध आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बससेवा ठप्प झाली होती. विटा आगारच्या ३०० बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे आगाराला मोठा फटका बसला. शहरातील सर्व रस्ते ओस पडले होते. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विटा शहरासह तालुक्यात फिरून आढावा घेतला.
विटा शहरासह खानापूर, भाळवणी, माहुली, लेंगरे ग्रामीण भागातील मोठा प्रतिसाद मिळाला.
फोटो-विटा १ ते ३ ओळ : विटा शहरात लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले होते. शनिवारी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
फोटो -विटा ४ ओळ : लॉकडाऊनमुळे विटा आगारातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली.