शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे पोलिसांचे रचनात्मक काम

By admin | Updated: May 19, 2017 23:37 IST

‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे पोलिसांचे रचनात्मक काम

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : पोलिसांनी डॉल्बीमुक्तीतून साकारलेला ‘सुखकर्ता’ बंधारा म्हणजे रचनात्मक काम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. मल्लेवाडी (ता. मिरज) येथे बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे लोकार्पण फडणवीस यांनी शुक्रवारी केले. यावेळी ते बोलत होते. सामाजिक कामासाठी पुढाकार घेणाऱ्या पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कल्पकतेचे त्यांनी यावेळी कौतुक केले. मल्लेवाडी येथे पोलिस दलातर्फे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८६३ सार्वजनिक गणेश मंडळांकडून डॉल्बीऐवजी बंधाऱ्यासाठी सुमारे २७ लाख ८० हजाराचा निधी संकलित करून मल्लेवाडी व मणेराजुरी येथे बंधारे बांधला आहे. ध्वनी प्रदूषणाऐवजी जलसंचयासाठी निधी दिल्याबद्दल गणेश मंडळांचे व गणेश मंडळांकडून संकलित झालेल्या निधीचा पोलिस कल्याण निधीऐवजी समाजासाठी वापर करणाऱ्या पोलिस अधीक्षक शिंदे यांच्या कल्पकतेचे फडणवीस यांनी कौतुक केले. पाण्यातून परिवर्तन घडविण्याच्या अशा रचनात्मक कामासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मिरजेतील सुभाषनगर येथे मिरज डेव्हलपमेंट फोरमतर्फे ऐतिहासिक आगट तलावातील लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामाची फडणवीस यांनी पाहणी केली. शिवाजी महाराजांनी उत्तम जलव्यवस्थापन केले होते. पूर्वीच्या काळात संस्थानिकांनी पाणीशास्त्राचा अभ्यास करून तलावाची निर्मिती केली होती. मात्र गाळ व अतिक्रमणामुळे ही नैसर्गिक व्यवस्था बिघडली आहे. जुन्या आगट तलावाचे पुनरूज्जीवन करून तलावाच्या शास्त्रशुध्द बांधणीचा वापर केल्याने पाणीसंचय व भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मकरंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पंचायत समितीच्या सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, किशोर पटवर्धन, मोहन वनखंडे, रविकांत साळुंखे, बाळासाहेब डोंगरे-माळी, गजेंद्र कुळ्ळोळी, शीतल पाटोळे आदी उपस्थित होते.