शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची कर्जास कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: April 19, 2017 23:30 IST

तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील शिवराम कृष्णा झांबरे (वय ६४) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 19 - तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील शिवराम कृष्णा झांबरे (वय ६४) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. सततच्या दुष्काळ व नापिकीला ते कंटाळले होते. त्यातच बॅंक, सोसायटीचे असलेले ३.५ लाख रुपये  कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी मृत्यूला कवटाळले. हा प्रकार बुधवारी घडला. तासगाव पोलिसात रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील डोंगरसोनी गावातील शिवराम कृष्णा झांबरे मुलगा संपत व कुटुंबाबरोबर ते शेती करतात. त्यांची एक एकर द्राक्ष बाग आहे. त्याना गतवर्षी झालेल्या अवकाळी पाउस व गारपीटीचा जबरदस्त फटका बसला होता. गारपीटीमुळे त्यांना गेल्या वर्षी दोनवेळा द्राक्ष छाटणी घ्यावी लागली होती. दुष्काळामुळे त्यांनी टँकरने पाणी घालून मोठ्या जिद्दीने त्यांनी द्राक्षबाग जोपासली होती.
 
द्राक्षबागेत शिवराम झांबरे कष्ट करत होते. परंतु यंदाही पाण्याची भीषण टंचाई व गतवर्षीच्या गारपीटीमुळे यंदा द्राक्षबागेला आलेली नापिकी त्यामुळे शिवराम झांबरे वैफल्यग्रस्त व गेले काही दिवस तणावात होते. त्यातच बॅंक, सोसायटीचे असलेले ३.५ लाख रुपये कर्ज कसे फेडायचे याची काळजी त्यांना सतावत होती. या तणावातच शिवराम यांनी आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबासह गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.