शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:53 IST

जत : तालुक्यातील अमृतवाडी येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने आपला मुलगा अशिष (४ वर्षे) याला पोटाशी बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. कौटुंबिक वादातून या विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.याप्रकरणी मृत प्रियांकाचा पती रामचंद्र सुखदेव बाबर यांनी जत पोलिसांत ...

जत : तालुक्यातील अमृतवाडी येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने आपला मुलगा अशिष (४ वर्षे) याला पोटाशी बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. कौटुंबिक वादातून या विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.याप्रकरणी मृत प्रियांकाचा पती रामचंद्र सुखदेव बाबर यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. रामचंद्र व प्रियांका यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रियांका यांचे माहेर देसारहट्टी (ता. अथणी) येथील आहे. लग्नानंतर त्यांना ऐश्वर्या (७ वर्षे) व अशिष ही दोन मुले झाली. शनिवारी प्रियांका व रामचंद्र यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात मुलगा अशिष याला घेऊन ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर काही अंतरावर कृष्णा बाबर यांच्या विहिरीजवळ येऊन, अशिष याला पोटाशी बांधून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.पाण्याचा उपसा करुन मृतदेह काढलेप्रियांका घरातून बेपत्ता झाल्यानंतर पती रामचंद्र, सासरा सुखदेव व सासू अंबूबाई हे दोघांचा सर्वत्र शोध घेत होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान त्यांना विहिरीच्या काठावर प्रियांकाचे चप्पल दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी जत पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार व सहकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.ही विहीर ८० फूट खोल असून विहिरीत सुमारे २७ फूट पाणी आहे. विहिरीला पायºया नाहीत. गावात भारनियमन असल्यामुळे वीज पुरवठा बंद होता. रात्री उशिरा वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर दोन विद्युत मोटारींद्वारे विहिरीतील पाणी रात्रभर उपसण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.प्रियांकाचे पती रामचंद्र हे शेतकरी आहेत. अमृतवाडी गावापासून पूर्व बाजूस सुमारे एक किलोमीटर अंतरावर बाबर वस्ती परिसरात त्यांची शेतजमीन आहे. शेतातच घर बांधून सासू, सासरा, पती व मुले सर्वजण एकत्रितपणे राहतात. मोठी मुलगी ऐश्वर्या सांगली येथील रामचंद्र यांच्या बहिणीकडे असते.