शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

उमदी पोलिस ठाण्यात संशयिताची आत्महत्या

By admin | Updated: June 8, 2016 00:42 IST

गूढ वाढले : पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा आरोप; महिन्यातील दुसरी घटना

उमदी : गुलगुंजनाळ (ता. जत) येथे गंगुबाई अमगोंड नंदगोंड या महिलेच्या खूनप्रकरणी संशयित म्हणून उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या राजकुमार गुंडाप्पा नंदगोंड (वय २८) याने उमदी पोलिस ठाण्याच्या शौचालयात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, राजकुमारच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकुमार याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. आठवडाभरापूर्वी गुलगुंजनाळ येथील वनविभागाच्या हद्दीत गंगुबाई नंदगोंड (वय २८) या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास उमदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्याकडे आहे. वाघमोडे यांनी संशयित म्हणून गंगुबाईचा दीर राजकुमार नंदगोंड व सासरे गुंडाप्पा नंदगोंड या दोघांना घुमकनाळ (ता. इंडी) येथून शनिवारी ताब्यात घेतले व उमदी पोलिस ठाण्यात आणून ठेवले. चौकशीनंतर रविवारी गुंडाप्पा नंदगोंड यांना सोडून दिले, मात्र त्यांचा मुलगा राजकुमार याला चौकीत ठेवून घेतले होते. गंगुबाई हिचा खून होण्याअगोदर राजकुमारच्या मोबाईलवर तिने अनेकदा संपर्क केला होता, अशी माहिती पुढे आल्याने पोलिसांनी राजकुमारची चौकशी सुरू केली होती. सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान राजकुमारने उमदी पोलिस ठाण्यातील शौचालयात रूमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी मंगळवारी पहाटे त्याच्या नातेवाईकांना कळवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी उमदी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. राजकुमारने आत्महत्या केली नसून, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पहाटे चार वाजता पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेला पाठविण्यात आला.राजकुमारने आत्महत्या केलेल्या शौचालयाची उंची कमी आहे. तेथे रुमालने गळफास घेऊन आत्महत्या करण्याइतपत जागाही नाही. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)एकाच महिन्यातील दुसरी घटनाकाही दिवसांपूर्वी उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संख पोलिस चौकीत युनूस अपराध या संशयिताने आत्महत्या केली होती. त्याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच दुसरी घटना घडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.गौडबंगालखून झाल्यानंतर सुरुवातीला गंगुबाई नंदगोंड हिची ओळख पटली नव्हती. मात्र नंतर ओळख पटल्यानंतर ती महिला कोण, कुठली, याची साधी नोंदही पोलिसांच्या स्टेशन डायरीत नाही. त्यामुळे यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलिसांच्या मारहाणीत राजकुमारचा मृत्यू : गुंडाप्पा नंदगोंड यांचा आरोपशनिवारी पोलिसांनी राजकुमार याला सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास अटक केली. त्याच्यासोबत मलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र रविवारी मला सोडून राजकुमार याला चौकशीसाठी ठेवून घेतले, पण मी तिथेच थांबून होतो. राजकुमार याला पोलिसांनी मारहाण केल्याचा, त्याच्या ओरडण्याचा आवाज बाहेर येत होता. ‘चौकशी करा, पण मारू नका’, अशी विनंती पोलिसांना केली. परंतु त्यांनी मारहाण चालूच ठेवली. त्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला, असा आरोप गुंडाप्पा नंदगोंड यांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्याची सीआयडी चौकशी सुरूया आत्महत्येप्रकरणी उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांची सीआयडीचे उपअधीक्षक पन्हाळकर यांनी अडीच तास बंद खोलीत चौकशी केली. पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरीही ताब्यात घेण्यात आली आहे. सीआयडी विभागाकडून गंगुबाई हिच्या खुनाच्या घटनास्थळाची पाहणी करण्यात आल्याचे समजते. पोलिस अधिकारी व कर्मचारी गोंधळातराजकुमार नंदगोंड याच्या आत्महत्येमुळे पोलिस अधिकारी गोंधळले होते. पत्रकारांनी राजकुमार नंदगोंड याला ताब्यात घेताना कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला होता का, असा प्रश्न विचारला असता वाघमोडे यांनी, ‘नाही’ असे स्पष्ट सांगितले.मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याने कर्नाटक पोलिसांना सूचना दिल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले.