शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

वसंतदादा स्मारकासाठी निधी देणार : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 4:35 PM

सांगलीतील वसंतदादा स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनामार्फत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. यावेळी वसंतदादा प्रेमींनी शासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त करीत निधी तातडीने देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देवसंतदादा स्मारकासाठी निधी देणार : सुधीर मुनगंटीवारशासनाच्या उदासिनतेबद्दल वसंतदादाप्रेमींची नाराजी

सांगली : सांगलीतील वसंतदादा स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनामार्फत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. यावेळी वसंतदादा प्रेमींनी शासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त करीत निधी तातडीने देण्याची मागणी केली.वसंतदादा पाटील यांची १0१ वी जयंती सांगली येथे मोठ्या उत्साहात सुरु आहे. त्यानिमित्त मुनगुंटीवर यांनी कृष्णाकाठच्या वसंतदादा स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम उपस्थित होते.

वसंतदादा जन्मशताब्दीबाबत शासन आदेशानुसार काय काय झाले, विचारणा अशी चर्चा मुनगुंटीवार यांनी केली. त्यावर शैलजाभाभी पाटील, उदय पवार यांनी जन्मशताब्दीबद्दल शासनाने फक्त आदेश काढून समिती जाहीर केली, मात्र आजअखेर समितीची एक बैठकही घेण्यात आली नाही, असे सांगितले. त्यावर मुनगुंटीवार यांनी याबाबत खंत व्यक्त केली.

सांगली शहरातील वसंतदादा स्मारकाचे काम थोड्याच निधीसाठी रखडले असल्याचे सांगितल्यानंतर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

प्रस्ताव मिळाल्यानंतर लवकरात लवकर वसंतदादा स्मारकासाठीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. सांगलीतील हे एक चांगले प्रेरणादायी स्मारक होईल, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSangliसांगली