शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बिऊरच्या जवानाचा राजस्थानमध्ये आकस्मिक मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

By संतोष भिसे | Updated: January 16, 2024 17:30 IST

भावाचे लग्न ठरविण्यासाठी येणार होते गावी, त्याआधीच काळाचा घाला

शिराळा : बिऊर (विश्रामबाग) ता. शिराळा येथील सैन्य दलात कार्यरत असणारे तेजस युवराज मोरे (वय २४) हे आपले कर्तव्य बजावत असताना चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रविवारी (दि. १४) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृतदेहास वडील युवराज मोरे, भाऊ तुषार यांनी भडाग्नी दिला. भावाचे लग्न ठरविण्यासाठी तेजस हे सोमवारी गावाकडे येणार होते, मात्र त्यांच्याऐवजी त्यांचा मृतदेहच दारात आल्याने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. तेजस व तुषार हे दोघे भाऊ २०१८ मध्ये एकत्रच सैन्यदलात भरती झाले होते. तेजस मॅकनाईज विभागात राजस्थानमधील लालगड येथे टेन्मेंट इन्फंटरी युनिट मध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना रविवारी चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने तेथील सैनिकी रुग्णालयात नेले. तेथून गंगानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने हेलिकॉप्टरने चंदीगड येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. तेजस यांचा मृतदेह घरी आल्यावर आई अनिता, वडील युवराज, भाऊ तुषार यांनी ह्रदय हेलावणारा आक्रोश केला. यावेळी नायब तहसिलदार हसन मुलाणी, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, मंडल अधिकारी सविता पाटील, गावकामगार तलाठी राहुल काळे, पोलिस पाटील सीताराम पाटील आदी उपस्थित होते. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला तेजस यांचे भाऊ तुषार हिमाचल प्रदेशात लष्करात कार्यरत आहेत. ते नुकतेच सुट्टीवर बिऊर येथे आले आहेत. तेजस यांना सुट्टी मिळाली नव्हती, मात्र त्यांनी कुटुंबियांना मी कोणत्याही परिस्थितीत सोमवारी (दि. १५) येत असल्याचे सांगितले होते. भावाच्या विवाहासाठी स्थळ पाहून लग्न करण्यासाठी ते येणार होते. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यांचा मृत्य नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगली