शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जत : आत्महत्येच्या प्रयत्नात ‘ती’ वाचली, बाळाचा जीव गेला-: कौटुंबिक वाद; महिला रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:20 IST

आसंगी-जत (ता. जत) येथील संगीता भानुदास गडदे (वय २२) या विवाहितेने आपल्या सव्वा महिन्याच्या बाळाला विहिरीच्या काठावर ठेवून, आपण विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती गंभीर असून

ठळक मुद्देआसंगी-जतची घटना

जत : आसंगी-जत (ता. जत) येथील संगीता भानुदास गडदे (वय २२) या विवाहितेने आपल्या सव्वा महिन्याच्या बाळाला विहिरीच्या काठावर ठेवून, आपण विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती गंभीर असून तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या घटनेत तिच्या बाळाचा भुकेने व्याकुळ होऊन व थंडीमुळे मृत्यू झाला.

ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी आसंगी-जत ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमंत रावसाहेब पाटील यांनी उमदी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.संगीता व भानुदास यांचा सुमारे अडीच वर्षापूर्वी विवाह झाला. भानुदास हा शेतमजूर आहे. संगीता ही कौटुंबिक वादातून काही दिवसांपासून माहेरी कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे राहत होती. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्यादरम्यान ती सासरी आसंगी-जत येथे आली होती. कौटुंबिक वादातून भानुदास व संगीता यांच्यामध्ये मतभेद होते. मामाला बोलावून घेऊ व आपल्यातील मतभेद मिटवू, अशी सूचना भानुदास याने संगीताला सायंकाळी माहेरहून आसंगी-जत येथे आल्यानंतर केली होती.

संगीताचे मामा आसंगी-जत गावालगत शेतात राहतात. सोमवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता उठली व तिने गावालगत असलेल्या तुकाराम टोणे यांच्या विहिरीकडे जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याआधी तिने बाळाला विहिरीच्या काठावर ठेवले होते. विहिरीत उडी घेतल्यानंतर, पाण्यातील विद्युत मोटारीच्या पाईपला धरून ती तशीच थांबली होती.सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान तुकाराम टोणे यांचा मुलगा अरुण हा विहिरीजवळ गेला असता, त्याला विहिरीच्या काठालगत मृतावस्थेत असलेले सव्वा महिन्याचे बाळ आढळून आले. त्यानंतर त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता, संगीता ही पाईपला धरून थांबलेली दिसली. या घटनेची माहिती त्याने गावातील नागरिकांना दिली.गावातील तरुणांनी वाचविले प्राणकाही तरुणांनी विहिरीत उतरून संगीताला बाहेर काढून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. सतत पाच-सहा तास थंड पाण्यात थांबल्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलीस करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू