शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

पारदर्शक कारभारामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

पलूस : वसंतरावजी पुदाले (दादा) यांनी सहकारातून सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी जो गुरुमंत्र ...

पलूस : वसंतरावजी पुदाले (दादा) यांनी सहकारातून सर्वसामान्य माणसांची आर्थिक उन्नती व पारदर्शक कारभार हा सहकारासाठी जो गुरुमंत्र दिला आहे, तो जोपासून वाटचाल सुरू आहे. सर्व सभासद व ग्राहक यांच्याशी बँकेचे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे प्रतिपादन पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले यांनी पलूस येथे केले.

पलूस बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, यावेळी वैभव पुदाले बोलत होते. यावेळी रमेश राजमाने, ए. डी. पाटील, पांडुरंग सूर्यवंशी, पांडुरंग मुळे, मानसिंग पाटील, अजित कुलकर्णी, विलास हजारे, आनंदराव पुदाले, काँग्रेस गटनेते सुहास पुदाले, नगरसेवक परशुराम शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे, नारायण सगरे, प्रकाश डाके, चंद्रकांत गोंदिल आदी उपस्थित होते.

वैभव पुदाले म्हणाले, बँकेची १५ हजार ८८२ सभासद संख्या असून, २१ शाखांद्वारे सेवा दिली जात आहे. सहकार क्षेत्रात बिकट अवस्था झालेली आहे. स्पर्धा निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढत बँकेची वाटचाल सुरू आहे. सहकार टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. सर्व सभासदांना विश्वासात घेऊनच बँकेच्या हिताचे निर्णय घेतले. कोअर बँकिंग प्रणालीद्वारे सेवा दिली जात आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ६५३ कोटीपेक्षा अधिक झाला आहे. एकूण ठेवी ३९४ कोटीपेक्षा जास्त, तर कर्जे २५९ कोटीपेक्षापेक्षा जास्त आहेत. बँकेचा एन.पी.ए. १.७३ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने बँकेचे कामकाज, दर्जा याबाबतीत समाधान व्यक्त करून गौरवोद्‌गार काढले आहेत.

बँकेचे उपाध्यक्ष शामराव डाके यांनी प्रास्ताविक केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी पाटील, डी. ए. माने, एस. ए. पाटील, नामदेव गावडे, सदाशिव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वासंती मेरू, नितीन खारकांडे, महेश कुलकर्णी, विलास हजारे, प्रकाश कचरे, शरद शिंदे, बाळासाहेब पुदाले, प्रकाश पाटील, गणपती सूर्यवंशी, मार्तंड सदामते, रंगराव नलवडे, महिपती जाधव, बजरंग सूर्यवंशी, जगदीश मोहोळकर, कृष्णा इदाटे, लालासाहेब संकपाळ, शिवप्रसाद शिंदे, लक्ष्मी कदम, ज्योती शितापे आदी उपस्थित होते. मुकेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू सिसाळ यांनी आभार मानले.