शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

राष्ट्रवादीच्या बेरजेपुढे विरोधकांची वजाबाकी

By admin | Updated: May 27, 2016 00:17 IST

इस्लामपुरात नगरपालिका : आगामी निवडणुकीत मातब्बरांचीच रेलचेल; तयारी सुरू

अशोक पाटील -- इस्लामपूरआगामी पालिका निवडणुकीत प्रभाग रचनेचा बदल, आरक्षण यावरच निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी सदस्यांच्या घरातच उमेदवारी मिळविण्यासाठी रेलचेल असणार आहे. तसेच विरोधी गटात एक-दोन प्रभागातच मातब्बरांची तयारी सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बेरजेपुढे विरोधकांची वजाबाकी होत असल्याचे चित्र आहे.गत निवडणुकीत ७ प्रभाग होते. ५ प्रभागात एकूण ४ उमेदवार, तर २ प्रभागात ३ उमेदवार होते. असे एकूण २६ आणि २ स्वीकृत असे २८ जण नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आगामी निवडणुकीत मात्र जनतेतून नगराध्यक्ष निवडावयाचा आहे, तर १४ प्रभाग होणार आहेत. त्यामध्ये प्रत्येकी २ उमेदवार असतील. त्यामुळे नगराध्यक्ष सोडून २८ नगरसेवक सभागृहात असतील. याव्यतिरिक्त स्वीकृतची संख्या वेगळी राहणार आहे.प्रभाग १ मधून ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, लता कुर्लेकर, नीलिमा कुशिरे हे विद्यमान नगरसेवक आहेत. या विद्यमान नगरसेवकांच्या घरातच उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. या प्रभागात मात्र विरोधी महाडिक गटाचे उदय पाटील वगळता सक्षम उमेदवार मिळणे मुश्कील होणार आहे.प्रभाग २ मध्ये खंडेराव जाधव, अरुणादेवी पाटील, चंद्रकांत पाटील, शुभांगी शेळके हे विद्यमान नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण पडल्यास अरुणादेवी पाटील या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असणार आहेत. खंडेराव जाधव हेही इच्छुक उमेदवार आहेत. डांगे गटाचे म्हणून चंद्रकांत पाटील यांनाही पुन्हा संधी मिळेल. एन. ए. गु्रपच्या शुभांगी शेळके यांनाच पुन्हा संधी मिळेल. या प्रभागात विरोधी गटातून प्रभावी नेतृत्व म्हणून वैभव पवार, दादा पाटील यांचे नाव घेतले जात आहे. परंतु उर्वरित २ सक्षम उमेदवार शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.प्रभाग ३ मध्ये विद्यमान नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, शिवसेनेचे आनंदराव पवार, सीमा इदाते, छाया देसाई हे विद्यमान नगरसेवक आहेत. यामध्ये विरोधी गटातून आनंदराव पवार, बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील, सनी खराडे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.प्रभाग ४ मध्ये चिमण डांगे, पीरअली पुणेकर, कविता पाटील, सुवर्णा कोळी हे नगरसेवक आहेत. यातील सुवर्णा कोळी यांच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे. त्यांच्याविरोधात एल. एन. शहा, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, सोमनाथ फल्ले यांची उमेदवारी असण्याची शक्यता आहे. प्रभाग ५ मध्ये संजय कोरे, मिनाज मुल्ला, आनंदराव मलगुंडे, वैशाली हांडे हे विद्यमान नगरसेवक आहेत. हे चारही नगरसेवक आगामी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तसेच त्यांच्याविरोधात विक्रमभाऊ पाटील, महाडिक गटाचे चेतन शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. विरोधकांना दोन उमेदवारांची कमतरता भासणार आहे.प्रभाग ६ मध्ये विरोधी पक्षनेते विजय कुंभार, महाडिक गटाचे कपिल ओसवाल, तर राष्ट्रवादीच्या मनीषा पाटील हे तीन नगरसेवक आहेत. दोन नगरसेवकांचा एक प्रभाग झाल्याने येथे एक नगरसेवक वाढणार आहे. राष्ट्रवादी यावेळी उमेदवार निवडून आणण्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर करतील. प्रभाग ७ मध्ये पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, शालन कोळेकर, कविता कांबळे हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. याठिकाणी विरोधकांचे पारडे कमकुवत आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीमध्ये मातब्बर नगरसेवकांच्या घरातच रेलचेल राहणार आहे. महिलांना आगामी निवडणुकीत अर्धचंद्रराष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विद्यमान महिला नगरसेवकांमध्ये काही ठराविकच महिला पालिकेच्या कारभारात सक्रिय आहेत. बहुतांशी महिला या नावापुरत्याच नगरसेविका आहेत. त्यांचे चेहरेही मतदारांना माहीत नाहीत. त्यामुळे अशा महिलांना आगामी निवडणुकीत अर्धचंद्र मिळेल.पकड राजकारणाचीविरोधी गटाला मार्गदर्शक व आपल्या भाषणबाजीतून प्रसिध्दीच्या झोतात आलेले सदाभाऊ खोत विधानपरिषदेवर आमदार होऊन मंत्रीही होतील. परंतु इस्लामपूर शहरातील राजकारणात आमदार जयंत पाटील यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागेल की नाही, हे येणारा काळच ठरवेल.