शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटबंधारे’ची कारखानदारांना मूकसंमती : सुभाष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:21 IST

विटा : गेल्या गळीत हंगामातील ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्याचे धाडस पाटबंधारे अधिकाºयांनीही दाखविले नसल्याने कारखानदार एक वर्षापासून पाणीपट्टीचे पैसे

ठळक मुद्देपाणीपट्टीचे पैसे वर्षभरापासून वापरताहेत साखर कारखानदार शेतकºयांनी ऊस बिलातून पाणीपट्टी भरली, त्यात त्यांचा काय दोष?

विटा : गेल्या गळीत हंगामातील ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्याचे धाडस पाटबंधारे अधिकाऱ्यांना ही दाखविले नसल्याने कारखानदार एक वर्षापासून पाणीपट्टीचे पैसे वापरत आहेत. त्यामुळे पाणीपट्टीचे पैसे वापरण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांना साखर कारखानदारांना मूकसंमती दिली असल्याचा आरोप खानापूर-कडेगाव तालुका शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी सोमवारी विटा येथे पत्रकारांशी बोलताना केला.

अ‍ॅड. पाटील म्हणाले, कडेगाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी शेतकºयांच्या ऊस बिलातून गेल्या गळीत हंगामात कपात केलेल्या ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची रक्कम कारखानदारांनी अद्यापही पाटबंधारे खात्याकडे जमा केली नाही.

२०१६-१७ च्या गत गळीत हंगामात पाटबंधारे खात्याने क्रांती, सोनहिरा, उद्गिरी, केन अ‍ॅग्रो, ग्रीन शुगर पॉवर यासह विविध साखर कारखान्यांना ताकारी योजनेची पाणीपट्टी कपात करण्यासाठी शेतकºयांच्या नावांची यादी दिली. शेतकºयांचा ऊस गळितासाठी गेल्यानंतर अनेक कारखान्यांनी यादीप्रमाणे पाणीपट्टीची रक्कम कपात केली. त्यातील काही कारखान्यांनी पाणीपट्टीची रक्कम खात्याकडे जमा केली. परंतु, काही कारखान्यांनी पाटबंधारे विभागाकडे अद्यापही जमा केली नाही. ही रक्कम कारखानदारांकडून वसूल करण्यासाठी पाटबंधारे अधिकाºयांनीही तसदी घेतल्याचे दिसून येत नाही.

त्यामुळे ताकारी योजनेच्या वीज बिलाची थकबाकी झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी, ताकारीचे रब्बी आवर्तन सुरू करण्यास तब्बल अडीच महिन्यांचा विलंब झाला आहे. गेल्या वर्षभरापासून पाणीपट्टीची रक्कम भरूनही शेतकºयांवर रब्बी पिके वाळवून घालविण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला पाटबंधारे अधिकारी, साखर कारखानदार जबाबदार आहेत. त्यातच पाणीपट्टीची कपात करून घेतलेली रक्कम वर्षभरापासून वापरण्यास कारखानदारांना पाटबंधारे अधिकाºयांनीच मूक संमत्ती दिली असल्याचा आरोप अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी यावेळी बोलताना केला.शेतकºयांचा काय दोष?शासनाने टंचाई काळात शेतकºयांची मांगणी लक्षात घेऊन ताकारी उपसा सिंचन योजना सुरू केली. या कालावधीतील योजनेचे वीज बिल ४ कोटी रूपये आले आहे. कार्यक्षेत्रात ग्रीन पॉवर शुगरकडे ८३ लाख व केन अ‍ॅग्रोकडे ९० लाख अशी या दोन साखर कारखान्यांकडे शेतकºयांच्या बिलातून वसूल केलेली तब्बल १ कोटी ७३ लाख रूपये पाणीपट्टी जमा आहे. तरीही त्यांनी रक्कम पाटबंधारे खात्याकडे जमा केलेली नाही. राज्य सरकार व या दोन कारखान्यांनी त्यांच्याकडील ५.७५ कोटीची रक्कम भरली असती, तर ताकारी योजनेचे आवर्तन सुरू झाले असते. शेतकºयांनी ऊस बिलातून पाणीपट्टी भरली, त्यात त्यांचा काय दोष? असा सवाल अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी केला.