शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड : प्रवेशातील गडबडीकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:09 IST

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.

ठळक मुद्देनामांकित महाविद्यालयांकडे कल; पालकांना भुर्दंड बसू नये, यासाठी दक्षता

सांगली : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. शहरातील प्रमुख कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवेश अर्ज देणे आणि स्वीकारण्याची मुदत २८ जूनपर्यंत असल्याने विद्यार्थ्यांना या कालावधित अर्ज जमा करावा लागणार आहे. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लूट होऊ नये यासाठी शिक्षणाधिकारी महेश चोथे यांचे बारीक लक्ष आहे.

जिल्ह्यातील २३८ कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी ठराविकच महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, कौशल्य व इतर माध्यमांची ४७ हजार ५२० इतकी प्रवेश क्षमता आहे. यावर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाला ९२.२५ टक्के इतका लागून ३८ हजार ४७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सुमारे हजार दहा जागा रिक्त राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रवेशाच्या नियोजनासाठी नुकतीच माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन याबाबतच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत.

अर्ज घेण्याच्या पहिल्या दिवशी सांगली शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होती. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, कन्या पुरोहित, जी. ए. कॉलेज आॅफ कॉमर्स, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, विलिंग्डन, चिंतामणराव वाणिज्य, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी, राणी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात माहितीपत्रक मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. पन्नास ते शंभर रुपयांना माहितीपुस्तिका कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध आहे. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे दिसून आले. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची सुरुवातीपासून चढाओढ राहणार असल्याचे संकेत आहेत.अकरावी प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम...प्रवेश अर्ज देणे व स्वीकारणे : दि. २५ ते २८ जूनअर्ज छाननी, गुणवत्तेनुसार निवड यादी : दि. २९ जून ते २ जुलैनिवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिध्द : दि. ३ जुलैनिवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश : दि. ४ ते ७ जुलैप्रतीक्षा यादीतील विद्यार्थी प्रवेश : दि. ९ ते १० जुलैदुसºया यादीतील विद्यार्थी प्रवेश : दि. ११ ते १२ जुलैएटीकेटी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया : दि. १३ ते १४ जुलैअकरावी वर्ग चालू : दि. १६ जुलै

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा