शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांच्या गाडीवर दगडफेक : महापालिकेच्या कारवाईदरम्यान जमाव आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:45 IST

कुपवाड : महापालिका प्रभाग समिती तीनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून वानलेसवाडीतील संत बाळूमामा मंदिरासमोरील खुल्या भूखंडावरील सभामंडपाचे अतिक्रमण बुधवारी दुपारी काढण्यात आले. यावेळी अज्ञातांकडून सहायक आयुक्त जी. टी. भिसे यांच्या शासकीय वाहनावर दगड फेकून काच फोडण्यात आली.संत बाळूमामा सेवाभावी संस्थेच्यावतीने वानलेसवाडीत खासगी एक गुंठा जागेवर बाळूमामा मंदिर बांधण्यात आले आहे. या ...

ठळक मुद्देवानलेसवाडीत मंदिराचे अतिक्रमण हटविताना घटना

कुपवाड : महापालिका प्रभाग समिती तीनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून वानलेसवाडीतील संत बाळूमामा मंदिरासमोरील खुल्या भूखंडावरील सभामंडपाचे अतिक्रमण बुधवारी दुपारी काढण्यात आले. यावेळी अज्ञातांकडून सहायक आयुक्त जी. टी. भिसे यांच्या शासकीय वाहनावर दगड फेकून काच फोडण्यात आली.

संत बाळूमामा सेवाभावी संस्थेच्यावतीने वानलेसवाडीत खासगी एक गुंठा जागेवर बाळूमामा मंदिर बांधण्यात आले आहे. या सेवाभावी संस्थेकडून व परिसरातील भाविकांकडून गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमासाठी जागा कमी पडत असल्याने जवळच असणाºया महापालिकेच्या ताब्यातील चार गुंठे खुल्या भूखंडावर महाप्रसाद, पूजाअर्चासह विविध उपक्रम राबविण्यासाठी सभामंडप बांधण्यात आला होता.

या खुल्या भूखंडावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या मंडपाबाबत सुधार समितीच्या पदाधिकाºयांनी व इतर नागरिकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. महापालिकेने यापूर्वीही एकदा हे अतिक्रमण काढून घेण्याबाबत संबंधित पुजाºयांना नोटीस बजावली होती. तरीही अतिक्रमण काढून घेतले गेले नाही. याप्रकरणी कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे महापालिकेचे सहायक आयुक्त जी. टी. भिसे, अतिक्रमण पथकप्रमुख दिलीप घोरपडे, अभियंता एन. डी. दळवी, अल्ताफ मकानदार, आदींच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी दुपारी बाळूमामा मंदिराच्या मंडपाचे अतिक्रमण जेसीबीच्या सहायाने काढून टाकले.

महापालिका पथकाकडून अचानक ही कारवाई करण्यात आली. यावेळी संतापलेल्या महिला भाविकांनी भिसे यांना घेराव घातला. तसेच अज्ञाताने भिसे यांच्या वाहनावर (एमएच १० एन ००२५) दगडफेक केली. यात गाडीची काच फुटली. यावेळी मंडपाची नासधूस झाल्यामुळे भाविक व अतिक्रमण पथकाचे अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.या घटनेची रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.नागरिकांची गर्दीयावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त मागविण्यात आला होता. अतिक्रमण हटाव कारवाईवेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.