शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘कृष्णा’त विरोधी संचालकांचा आडमुठेपणा

By admin | Updated: October 15, 2015 00:38 IST

हंगामास असहकार्य : कर्जाच्या थकहमी करारावर स्वाक्षरी करण्यास विरोध

शिरटे : य. मो. कृष्णा कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी कारखान्याचा हंगाम वेळेवर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी सातारा जिल्हा बँकेकडून ४५ कोटी रूपयांच्या पूर्वहंगामी अल्पमुदत कर्जाच्या थकहमी करारावर विरोधी संस्थापक पॅनेलच्या सहा संचालकांनी बुधवारच्या बैठकीत सह्या करण्यास आडमुठेपणा दाखवत, सभासद आणि कारखान्याप्रती असलेल्या अनास्थेचेच दर्शन घडविले आहे.कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. कारखाना आर्थिक संकटात असला तरी, सभासदांचे हित लक्षात घेऊन हंगाम वेळेवर सुरू करण्याच्यादृष्टीने डॉ. सुरेश भोसले यांनी पावले उचलली आहेत. कारखान्याचा हंगाम सुरू करण्यापूर्वी तोडणी वाहतूक यंत्रणा, यंत्रसामग्री देखभाल यासह अन्य अनुषंगिक कामे आटोपणे गरजेचे असते. वास्तविक गेल्या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे कोणतीही बँक कारखान्यास कर्ज देण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने मात्र ४५ कोटी रूपयांचे पूर्वहंगामी अल्प मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. यासाठी सर्व संचालकांकडून थकहमी घेतली जाते. याबाबत आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असता, विरोधी संस्थापक पॅनेलचे संचालक व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्याच गटाच्या अन्य ५ संचालकांनी या थकहमी करारावर सही करण्यास नकार दर्शविला. त्यांच्या या कृतीचा सभासदांकडून निषेध व्यक्त केला जात असून, कारखाना सुरूच होऊ नये यासाठी विरोधी संचालक अशी विकृत मनोवृत्ती जोपासत असल्याची टीका सभासदांकडून केली जात आहे.सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हंगामपूर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी कर्जस्वरूपातील रक्कम गरजेची आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार ४० लाख मेट्रिक टन साखर निर्यात कोटा नुकताच जाहीर केला आहे. याअंतर्गत कृष्णा कारखान्याला २ लाख २ हजार ९५५ क्विंंटल साखर निर्यात करण्याची मंजुरी मिळाली असून या साखरेला जास्तीत जास्त दर मिळवून पारदर्शीपणे निर्यात प्रक्रिया राबविण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला आहे. (वार्ताहर)आॅलिम्पिक दर्जाचा अ‍ॅथलेटिक ट्रॅक उभारणार? २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या सध्याच्या नवीन इमारतीच्या पुढील बाजूस विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत असा आॅलिम्पिक दर्जाचा अ‍ॅथलेटिक ट्रॅक उभारण्यासाठी शासनाकडे अनुदान मागणी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच याचठिकाणी आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उभारण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.