शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

टांग्यांच्या गावातच अस्तित्वासाठी टांगेवाल्यांची धडपड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:07 IST

सदानंद औंधे  मिरज : प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून वापरण्यात येणारा टांगा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या संख्येने ...

सदानंद औंधे मिरज : प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून वापरण्यात येणारा टांगा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या संख्येने टांगे असलेल्या मिरजेत आता केवळ १५ टांगे शिल्लक आहेत. प्रवासी भाडे मिळत नसल्याने टांग्यातून मालाची वाहतूक करण्यात येत आहे.प्रवासी मिळत नसल्याने टांगाचालकांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासी मिळत नसल्याने घोड्यास जगविणे कठीण झाले आहे. टांगा व्यवसाय करणाऱ्या बहुसंख्य अशिक्षित टांगाचालकांना हलाकीचे दिवस आले आहेत. दिवसभर भाड्याच्या प्रतीक्षेत असणारे टांगाचालक नाईलाजाने मालवाहतूक करीत आहेत. बांधकामाचे साहित्य टांग्यातून नेण्यात येत आहे. साहित्य टांग्यात चढविण्याचे व उतरविण्याचे काम टांगाचालक करीत आहेत. 

पूर्वी टांग्याचा रुबाब होता; मात्र आता टांग्यात बसायला लाज वाटत असल्याने टांगा सर्वजण टाळत आहेत. टांग्याने जाण्यासाठी उशीर लागत असल्याने बस, वडाप किंवा रिक्षाने प्रवास सोयीस्कर ठरला आहे. बाल-गोपाळांची हौस व मनोरंजन म्हणून एखादा फेरफटका मारण्यासाठी आता टांग्याचा वापर होतो.

पेट्रोलची बचत व प्रदूषण नसलेला टांगा आता कोणीही वापरत नाही. चपळ, वेगवान व शिंगे नसल्याने गर्दीच्या ठिकाणी घातक नसणाºया देशी घोड्याचा टांग्यासाठी वापर होतो. घोडागाडी असणे हे एकेकाळी स्टेटस सिंबॉल होते. घोडागाडीचा प्रकार असलेली टांगा व बग्गी ही वाहने आपल्याकडे वापरात होती.मिरजेत १९८० पर्यंत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूस टांगा स्टॉप होता. किरण हॉटेलजवळ, देवल टॉकीजजवळ, मिशन हॉस्पिटलजवळ, दत्त चौकात, कृष्णाघाटावर, शास्त्री चौक, पोलीस चौकीजवळ असे मिरजेतल्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी, बाजारपेठेत टांगा स्टॉप होते.

रिक्षा व अन्य वाहने उपलब्ध झाल्यानंतर टांग्याचे महत्त्व कमी झाले. टांगा स्टॉपच्या जागेवर रिक्षा थांबे झाले. काही जागा फळविक्रेत्या, भाजीपाला विक्रेत्यांनी ताब्यात घेतल्या. आता मिरजेत किसान चौक टांगा व गांधी चौकातील टांगा स्टॉपवर केवळ १५ टांगे शिल्लक आहेत.म्हातारपणी घोड्याला कसे सोडणार?घोड्याचा खुराक व टांग्याचा देखभाल खर्च भागविण्यासाठी मालवाहतुकीशिवाय पर्यायच नाही. अन्य कोणताच व्यवसाय करण्याची उमेद आता राहिली नाही. आयुष्यभर साथ देणाºया घोड्याला म्हातारपणी सोडता येत नसल्याने, दररोज केवळ तीनशे ते चारशे रुपयात घोड्याचा व कुटुंबाचा खर्च चालवावा लागत असल्याचे, गेली ४० वर्षे टांगा व्यवसाय करणारे सलीम पठाण यांनी सांगितले.टांगाचालकांची ओळखपत्रे ठाण्यात जमाप्रवासी वाहतुकीसाठी पूर्वी टांग्याचेही वाहतूक नियमानुसार पासिंग केले जात होते. यासाठी टांग्यात कुशन गादी, रात्रीसाठी पुढे कंदील, दोन मोठ्या, तीन लहान आसनांची व्यवस्था करावी लागत असे. पाच प्रवाशांच्या वाहतुकीची परवानगी असलेल्या टांग्यास पुढील बाजूस पासिंगची माहिती असणारी लोखंडी पत्र्याची पट्टी असे.

टांगाचालकास ओळखपत्र म्हणून बिल्ला मिळायचा. टांग्याचे पासिंग थांबविल्यानंतर मिरजेत टांगाचालकांची ओळखपत्रे पोलीस ठाण्यात जमा केली. सध्या टांगा व्यवसायावर परिवहन विभागाचे नियंत्रण नाही.