कामेरी : येडेनिपाणी ता. वाळवा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.
हिंदुराव माळी, सुनील धारे, कृष्णात पाटील, माणिक थोरात, अशोक देसाई व अनंत पाटील या शेतकऱ्यांचे केळी, शेवगा, झेंडू, ढबू मिरची, ऊस व कारली या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती घेतली. शासन दरबारी प्रयत्न करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन नाईक यांनी दिले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष एस. आर. पाटील, सरपंच डॉ. सचिन पाटील, माजी सरपंच राजाराम पाटील, हिंदुरावनाना पाटील सोसायटीचे अध्यक्ष रायसिंग पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक डॉ. प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पाटील, तलाठी हेमलता मोरे, कृषी सहायक स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.