शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन लागू न केल्यास तीन महिन्यांनंतर पुन्हा संप - पी. एन. काळे 

By अशोक डोंबाळे | Updated: April 13, 2023 11:53 IST

पेन्शनचे सर्व लाभ घेतल्याशिवाय संघटना मागे हटणार नाही; संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

सांगली : समन्वय समितीच्या चर्चेनुसार १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन लागू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. त्यानुसार त्यांनी आश्वासन पाळले नाही तर तीन महिन्यांनंतर १८ लाख शिक्षकांसह सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर जातील, असा इशारा कर्मचारी व शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक पी. एन. काळे यांनी दिला आहे.शासकीय कर्मचारी, शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने काढलेल्या आदेशाबाबत चर्चा करण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पी. एन. काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले, जुनी पेन्शन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील १७ लाख शासकीय व निमशासकीय शिक्षक, कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी केला. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केले आहे. शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या व होणाऱ्या मयत कर्मचारी कुटुंबीयांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. सेवा उपदान (ग्रॅज्युईटी) आणि सेवानिवृत्त होणाऱ्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्याचा शासन निर्णय शासनाने दि. ३१ मार्च २०२३ रोजी घेतला आहे. शासनाचा हा निर्णय संघटनेला मान्य नसल्यामुळेच समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सचिव यांच्या संपर्कात आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वच कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे, अशी मागणी आहे. १९८२ प्रमाणे पेन्शनचे मिळणारे सर्व लाभ घेतल्याशिवाय संघटना मागे हटणार नाही. वेळप्रसंगी कर्मचारी तीन महिन्यांनंतर परत बेमुदत संप करतील, असा इशाराही काळे यांनी दिला आहे.यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक, कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, कोषाध्यक्ष एच. एस. सूर्यवंशी, चतुर्थश्रेणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने, सरचिटणीस गणेश धुमाळ, कार्याध्यक्ष मिलिंद हारगे, कोषाध्यक्ष संदीप सकट, एनपीएस संघटनेचे अध्यक्ष रवी अर्जुने, झाकीरहुसेन मुलाणी, संगीता मोरे, प्रतिभा हेटकाळे, शीतल ढबू, प्रदीप पाटील, राजेंद्र बेलवलकर, सुधीर गावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPensionनिवृत्ती वेतन