शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आयर्विनच्या समांतर पूलप्रश्नी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीतील आयर्विन पुलास लगतच मंजूर असलेल्या पर्यायी पुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगलीतील आयर्विन पुलास लगतच मंजूर असलेल्या पर्यायी पुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजपच्या वतीने शिवशंभो चौकात रास्ता रोको करण्यात आला.

आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

भाजपने यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयर्विन पुलास समांतर पूल मंजूर होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. तरीही या पुलाचे काम सुरू झालेले नाही. आयर्विन पुलाची डागडुजी सुरू असल्याने त्यावरून वाहतूक बंद आहे. त्यामुळे बायपास पुलावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे सांगलीतील मुख्य बाजारपेठेवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत आणणे अवघड झाले आहे.

शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. व्यापारी, शेतकरी यांच्यासह सांगलीत येणाऱ्या नागरिकांचीही अडचण झाली आहे.

शिवशंभो चौकात दुपारी साडेचार वाजता रास्ता रोको आंदोलन केले. माजी आमदार दिनकर पाटील हे सांगलीवाडीतील सुमारे शंभरावर कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी समांतर पूल झाला पाहिजे असे फलक लावले. मात्र, त्यावर चिंचबाग व बाजारपेठ वाचवून झाला पाहिजे, अशी मागणी केली होती.

शिवशंभो चौकात रास्ता रोको आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली. शहरात येणारा हा एकच मार्ग सुरू असल्याने याठिकाणी लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलन लवकर संपवण्याचे आवाहन केले.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांच्याशी चर्चा केली. पर्यायी समांतर पुलाचे काम मंगळवारपासून सुरू करण्याची सूचना केली. आराखडा मंजूर आहे, निधी मंजूर आहे. चार-पाच जणांच्या मागणीसाठी पाच लाख लोकांना वेठीस धरू नका, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी गाडगीळ यांनी दिला.

चौकट

दिनकर पाटील यांचा पाठिंबा

माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले की, समांतर पूल चिंचबागेजवळून जातो. तो पुढे कापडपेठेत गेल्यास बाजारपेठेवर परिणाम होईल. त्यामुळे आयर्विन पुलाच्या दक्षिणेस पूल झाल्यास त्याचा सगळ्यांना लाभ होईल. तसेच पूर्वी मंजूर केल्याप्रमाणे पंधरा मीटरने तो आहे त्या जागी झाल्यास अडचण येणार नाही, मात्र त्याची रुंदी वाढविल्यास चिंचबागेजवळील मैदानास बाधा पोहोचू शकते.