शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

भानगडी थांबवा, अन्यथा नेतृत्व सोड

By admin | Updated: June 16, 2016 01:11 IST

जयश्रीतार्इंचा इशारा : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारलेू

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील भानगडींमुळे व्यथित झालेल्या काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पालिकेतील भानगडी थांबविण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे. तुमच्या कारभारामुळे आमची बदनामी होते. भानगडी थांबविल्या नाहीत, तर नेतृत्व सोडू, असा इशाराही पाटील यांनी दिल्याचे समजते. महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी जयश्रीताई पाटील यांनी पालिकेच्या कारभाराबाबत बैठक घेतली. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेतील भानगडींमुळे सत्ताधाऱ्यांची बदनामी होत आहे. त्यात पक्षांतर्गत गटबाजीमुळे अनेक भानगडी चव्हाट्यावर येत आहेत. त्याची दखल घेऊन जयश्रीताई पाटील यांनी बैठक बोलाविली होती. काँग्रेसच्या काही नगरसेवकांसह मदनभाऊ गटातील कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कारभाराबाबत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. यात घनकचरा प्रकल्पांतर्गत यंत्रसामग्री खरेदी, भूसंपादनाची नुकसानभरपाई या विषयांवर विशेष जोर होता. त्याशिवाय महासभा व ऐनवेळच्या विषयातून होणारा बाजारही चर्चेच्या केंद्रस्थानी होता. मदन पाटील असताना पालिकेतील कारभारी भानगडी करायचे, पण नेहमीच मदनभाऊंनी त्यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष केले होते. त्याचे राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमधील सर्वच नगरसेवकांनी जयश्रीतार्इंना नेतृत्व करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार पालिकेची जबाबदारी जयश्रीतार्इंनी स्वीकारली आहे. पण त्यानंतरही पालिकेतील भानगडी थांबलेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जयश्रीतार्इंनी पालिकेच्या कामकाजाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)कारभार तुमचा, बदनामी आमचीतुमच्या कारभारामुळे आमची बदनामी होते. लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. महिन्याभरात कारभार सुधारा, भानगडी थांबवा, अन्यथा महापालिकेचे नेतृत्व सोडू, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.