शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

जिल्ह्यात १२ बसेसवर दगडफेक

By admin | Updated: June 10, 2014 02:11 IST

एस. टी. बसच्या फेऱ्या रद्द : कर्नाटक वाहतूक बंद; बंदोबस्त वाढविला

सांगली/मिरज : फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचे पडसाद आज, सोमवारी दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात उमटले. सांगली, मिरज आणि इस्लामपूर परिसरात पुन्हा एसटी बसेसना टार्गेट करून अज्ञातांनी दिवसभरात बारा बसेसवर दगडफेक केली. एस.टी.च्या जिल्ह्यातील अनेक फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या. अफवा, दगडफेकीमुळे कर्नाटक एस.टी.ची वाहतूक दिवसभर बंद होती. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सांगली-कुरुंदवाड बसवर चौघांनी दगडफेक केली. त्यानंतर सिव्हील चौकात जत-कोल्हापूर व विटा-सांगली या दोन बसेसवर दगडफेक करून घोषणा देत संशयितांनी पलायन केले. या तिन्ही घटना एकाचवेळी घडल्याने शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दगडफेकीत तिन्हीही बसेसचे प्रत्येकी पंधरा हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मिरज व ग्रामीण भागात एसटीवर दगडफेकीचे सत्र आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. मिरज, नरवाड व परिसरात सहा बसेसवर दगडफेक करण्यात आल्याने एसटीच्या १६४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. कर्नाटक एसटीची वाहतूक दिवसभर बंद होती. काल, रविवारी दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली होती. रात्री मुक्कामाला जाणाऱ्या व आज सकाळी येणाऱ्या सहा बसेसवर अज्ञातांनी दगडफेक करून पलायन केले. मिरज आगारातून फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मिरज एसटी आगाराचे तीन लाख १५ हजारांचे उत्पन्न बुडाले. कर्नाटक सीमाभागातही बंद असल्याने कर्नाटकात जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी बसेस बंद होत्या. मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या २० व कर्नाटकातून येणाऱ्या १५३ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने दिवसभर महाराष्ट्र-कर्नाटक एसटी वाहतूक बंद होती. (प्रतिनिधी)