शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मदनभाऊंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल

By admin | Updated: April 14, 2017 23:09 IST

जयश्रीताई पाटील : महापालिकेच्या ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन; सांगली, कुपवाडला स्वच्छ पाणी

सांगली : सांगली व कुपवाड या दोन शहरांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचे मदन पाटील यांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल महापालिकेने टाकले आहे. ५६ एमएलडी जलशद्धीकरण केंद्रामुळे दोन्ही शहरांना स्वच्छ पाणी मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी शुक्रवारी केले. महापालिकेच्या माळबंगला येथील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद््घाटन श्रीमती पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. महापौर हारूण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, गटनेते किशोर जामदार, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, नगरसेवक दिलीप पाटील, धनपाल खोत यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाल्या की, माळबंगला येथील ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचा विस्तार वाढविण्यात आला आहे. आता ५६ एमएलडी पाणी शुद्ध होणार आहे. त्यामुळे सांगली व कुपवाड या दोन शहरांना स्वच्छ पाणी मिळेल. या दोन्ही शहरांसाठी मदन पाटील यांनी वारणा उद््भव योजना आणली होती. शहराला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते. वारणा पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद सागरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती सुनीता खोत, माजी सभापती गुलजार पेंढारी, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक पांडुरंग भिसे, रोहिणी पाटील, पुष्पलता पाटील, अलका पवार आदी यावेळी उपस्थित होते. अभियंता अजित जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)