शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव तालुक्यात राजकीय तणाव

By admin | Updated: November 19, 2015 00:39 IST

सरपंच निवडी : कौलगे, दहीवडी, सावळज, गव्हाणमध्ये वादावादी

तासगाव : तासगाव तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील १३ गावांत सरपंच निवडीवरुन अनेक गावांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या निवडीच्यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आमने-सामने आले. कौलगे, दहीवडी, सावळज, गव्हाणमध्ये कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी तीन टप्प्यात पार पडल्या. तालुक्यात वर्चस्व कोणाचे, यावरुन भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सरपंच निवडीसाठी रस्सीखेच सुरु होती. त्यामुळे तालुक्यातील सरपंच निवडीचा विषय कधी नव्हे इतका चर्चेचा आणि उत्सुकतेचा ठरला. मंगळवारी कौलगे येथे सरपंच आणि उपसरपंच निवड झाली. याच निवडीवरुन मंगळवारी रात्री उशिरा दोन गटात बाचाबाची झाली. या घटनेनंतर कौलगेतील वातावरण तणावपूर्ण बनले. बुधवारी झालेल्या सरपंच निवडीवेळी दहीवडीतही भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन गटात सदस्यांच्या फोडाफोडीतून बाचाबाची झाली. तणाव वाढल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गव्हाण, सावळजमध्येदेखील सरपंच कोणाचा होणार? यावरुन तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. (वार्ताहर)