शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा पीए सांगलीत बांधकामावर मजूर, संसारोपयोगी साहित्याच्या यादीत नाव

By संतोष भिसे | Updated: May 27, 2025 16:11 IST

भांडी वाटपातील घोटाळ्याची झलक, ९० लाख अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत

संतोष भिसेसांगली : एखाद्या मंत्र्याचा पीए बांधकामावर मजुरी करतोय हे तुम्हाला पटेल? पण वस्तुस्थिती तशीच आहे. राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांचा स्वीय सहायक सांगलीत बांधकाम कामगार म्हणून राहतो तशी नोंदही शासकीय दप्तरी झाली आहे. खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनीच ही माहिती दिली. यानिमित्ताने कामगारांसाठीच्या भांडी वाटप योजनेतील राज्यव्यापी घोटाळ्याची झलक स्पष्ट झाली आहे.बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संसारोपयोगी साहित्याचा लाभार्थी म्हणून यादीमध्ये स्वीय सहायकाचे नाव आले आहे. खुद्द शिरसाट यांनीच छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. बांधकाम कामगारांना शासनातर्फे संसारोपयोगी साहित्य वाटप केले जाते. सांंगलीतील लाभार्थ्याच्या यादीत शिरसाट यांच्या स्वीय सहायकाचेही नाव आले आहे तसा फोन सांगलीतून स्वीय सहायकाला गेला. ‘तुमची भांडी आणि साहित्य आले आहे, घेऊन जा’ असा निरोप त्यांना देण्यात आला. या फोनमुळे स्वीय सहायक चक्रावून गेला.बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजनेत राज्यभरात घोटाळा झाला असून त्याची ही झलक असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. ‘सांगली कुठे आणि छत्रपती संभाजीनगर कुठे? हे समजत नाही. भांडी नेण्यासाठी सहायकाला सांगलीतून फोन येतो,’ यावरून या योजनेत राज्यभरात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे` असे शिरसाट म्हणाले. खुद्द मंत्री महोदयांनीच घोटाळा अधोरेखित केल्याने बांधकाम कामगार महामंडळातील अनागोंदी पुढे आली आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा झालेल्या उपकरांतून कामगारांना भांड्यांचा संच, सुरक्षा साधने व अन्य साहित्याचे वाटप केले जाते. पण या योजनेत खूपच मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. कामगारांची बोगस नोंदणी, एजंटांमार्फत पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना भांडी वाटप असे प्रकार सर्रास झाल्याची तक्रार आहे.

९० लाख अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत

  • राज्यात सद्य:स्थितीला ३५ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. अद्याप ९० लाखांहून अधिक अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. कामगारांच्या कल्याणकारी योजनांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडून उपकर गोळा केला जातो.
  • आजपर्यंत सुमारे २२ हजार २० कोटी ९३ लाख रुपये उपकर संकलित झाला आहे. कल्याणकारी योजनांवर १८ हजार ५४४ कोटी रुपये खर्च केला आहे. व्यवस्थापनावरील खर्च ३९९ कोटी रुपये आहे. एकूण खर्च १८ हजार ५४४ रुपये झाला आहे.
  • मंडळाच्या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांत साहित्य वाटपासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च झाला असून मंडळाकडे योजना राबविण्यासाठी फक्त ३०२७ कोटी रुपये शिल्लक आहेत.
  • कामगारांना माध्यान्ह भोजन, भांडी वाटप व सुरक्षा संच देण्यासाठी १५ हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च केली आहे.

कामगारांना वस्तुरूपाने लाभ देण्यासाठी १५ हजार कोटींचा खर्च करताना राज्य शासनाने केंद्राची परवानगी घेतलेली नाही. कायदेशीर तरतुदींचे पालन केलेले नाही. त्यामुळे हे महामंडळ येत्या सहा महिन्यांत आर्थिक संकटामुळे बंद पडण्याची शक्यता आहे. शासनाने ही रक्कम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे त्वरित जमा करावी. मंडळ व्यवस्थित सुरू ठेवावे. अन्यथा ९ ऑगस्टपासून आम्ही मुंबईत आंदोलन करणार आहोत. - शंकर पुजारी, राज्य निमंत्रक, बांधकाम कामगार संघटना, संयुक्त कृती समिती

टॅग्स :Sangliसांगलीministerमंत्री