शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजना तात्काळ सुरू करा जलव्यवस्थापन समिती : स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:02 IST

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे सिंचन योजना तात्काळ सुरू करा जलव्यवस्थापन समिती : स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र ग्रामसभा

सांगली : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसात जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीमध्ये सदस्यांनी केली. योजना तात्काळ सुरु करण्याच्या मागणीचा ठराव करुन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासनही अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सदस्यांना दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, ब्रम्हानंद पडळकर, तम्मणगौडा पाटील, सुषमा नायकवडी, चंद्रकांत पाटील, आशाराणी पाटील, स्नेहलता जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते.

यंदा दुष्काळी पट्ट्यात पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांना पाणी नाही. हातची पिके वाया जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी सिंचन योजना सुरु करण्याची मागणी होत आहे. योजना काही दिवस सुरु करून ओढे, नाले, मध्यम प्रकल्प, कालवे, तलाव भरून घेतले, तर शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही.

सध्या नदीतून वाहून जाणारे पाणी सिंचन योजनांतून वळते करावे, अशी मागणी यावेळी सर्व सदस्यांनी केली. त्यावर संग्रामसिंह देशमुख यांनी, ही मागणी शासनाकडे कळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना या बैठकीचा अभिप्राय कळविण्याचे आदेश अधिकाºयांना दिले.

जिल्हा हगणदारीमुक्तीनंतरही अतिरिक्त सर्व्हेमध्ये २४ हजार कुटुंबांची नोंदणी झालेली असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, सर्व्हे करून याशिवाय इतर वंचित कुटुंबे असतील, तर त्यांचाही समावेश स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छतागृहासाठी करण्यात यावा, त्यासाठी अतिक्रमण नियमितीकरणाच्या ग्रामसभेत किंवा स्वतंत्र ग्रामसभेचे आयोजन करून मागणी कळवावी, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास दिल्या.

जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधित ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती अभियान होत आहे. अभियानाबाबत सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सावळज येथील मावले टेक आणि पलूस तालुक्यातील घोगाव येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाच्या कामास मंजुरी देण्यात आली.टंचाईग्रस्त भागात टँकर द्याजिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांनी तालुक्यांकडे टॅँकर मागणी केलेल्या गावांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तहसीलदार यांना अधिकार देण्यात यावेत. टंचाई असल्यामुळे टॅँकरची मागणी होत आहे, मात्र तहसीलदार यांना अधिकारच नसल्याचे सांगितले जाते. हे अधिकार देण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक