शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

स्थायी सदस्यांचा सभागृहात ठिय्या- पावसाळी मुरूमावरून वाद : निविदाच न काढल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:12 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक संतप्त झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या मांडत प्रशासनाचा खोटारडेपणा उघडकीस आणला. अखेर आयुक्त, उपायुक्तांनी तीन दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळी मुरूम उपलब्ध करण्याची ग्वाही दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.

सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक दिलीप पाटील, शिवराज बोळाज, प्रियांका बंडगर, प्रशांत पाटील यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी पावसाळी मुरूमाचा मुद्दा उपस्थित केला. गत सभेत बांधकामचे उपअभियंता सतीश सावंत यांनी पावसाळी मुरुमाची निविदा काढण्यात आली असल्याचे सांगितले होते. मंगळवारी सदस्यांनी, या निविदेचे काय झाले? अशी विचारणा केली.

त्यावर शहर अभियंता बामणे यांनी, निविदा काढली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यांचा पारा चढला. सावंत यांनी सभागृहाला खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर बांधकाममधील अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. केवळ शामरावनगरसाठी मुरुमाची निविदा काढल्याचा खुलासा केला.

त्यावर दिलीप पाटील यांनी, गत सभेतील इतिवृत्तांताच्या सत्यप्रती सदस्यांसह अधिकाºयांना दिल्या. गत सभेत सावंत यांनी निविदा काढल्याचे इतिवृत्तात स्पष्टपणे म्हटले होते. प्रशासन पावसाळी मुरुमासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसताच सर्वच सदस्य सभापतींच्या आसनासमोर एकवटले. सदस्यांनी सभागृहात आंदोलन सुरू केले. तब्बल अर्धा ते पाऊण तास नगरसेवकांचे आंदोलन सुरू होते. अधिकाºयांकडून खोटी माहिती दिली जात असल्याबद्दल सदस्यांनी संताप व्यक्त केला.

नगरसेविका बंडगर यांनी, शामरावनगरपेक्षाही दत्तनगरमध्ये दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने मुरूम दिलेला नाही. नागरिकांनाही, प्रशासनाचा खरा चेहरा सांगता येईल, उद्यापर्यंत मुरूम न मिळाल्यास महासभेत आवाज उठवण्याचा इशारा दिला.अखेर उपायुक्त सुनील पवार यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आयुक्तांनी तीन दिवसांची शॉर्ट नोटीस काढून पावसाळी मुरूम उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली.भावना अन् आशाप्रशासनाच्या कारभारावर नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली. उपायुक्त पवार यांनी, प्रशासनाची काम करण्याची भावना आहे. आयुक्तसाहेब निश्चित पावसाळी मुरुमाच्या फाईलवर सह्या करतील असे सांगून सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रशांत पाटील यांनी, प्रशासनाच्या भावना व आशेवरच सांगलीकर नागरिक आहेत, असा टोला लगावला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण