कडेगाव : ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत ‘लोकमत’ व ‘विश्वजितेश फाैंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचणी (ता. कडेगाव) येथील लोकनेते मोहनराव कदम सभागृहात रक्तदान शिबिर झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी युवानेते डॉ. जितेश कदम, कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक संतोष गोसावी, चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, चिंचणीच्या सरपंच मनीषा माने, डॉ. सुधीर डुबल, डॉ. महेश चव्हाण, डॉ. अश्पाक मुल्ला, डॉ. संचित कोळी, डॉ.अरुण दाईंगडे, मुन्ना शेख, जलाल मुल्ला, अकबर मुल्ला, अशोक महाडिक, उपसरपंच दीपक महाडिक आदींसह विश्वजितेश फाैंडेशनचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरात सुजितकुमार सबनीस, संभाजी मांडके, रोहित थोरात, कृष्णत माने, प्रतीक गायकवाड, अनिकेत जाधव, प्रमोद कुंभार, धीरज मोहिते, संतोष पाटील, राजू हजारे, गणेश कदम, राहुल पवार, ओंकार महाडिक, नीलेश भोसले, दीपक गायकवाड, अमित पाटील, सूरज माळी, प्रमोद सूर्यवंशी, अश्पाक मुल्ला, दत्तात्रय शिर्के, विजय कोळेकर, रोहित जगदाळे, शैलेश मोहिते, हणमंत कदम, धनाजी कदम, विजय जंगम, सोमनाथ करांडे, नितीन मोहिते, अरविंद पाटील, प्रकाश जाधव, उमेश जमदाडे, सचिन मोहिते, वैष्णव अडसुळे, विशाल महाडिक, नितीन पाटील, हृषिकेश माने, अरबाज मुलाणी, जावेद पठाण, प्रवीण निकम, सूरज पाटील, प्रफुल्ल पाटील, वैभव डुबल, किरण जाधव, संकेत होवाळे, जोतिराम थोरात, मंगेश चौगुले, सिराज मुजावर, किरण माने, धनाजी पाटील, असिफ शिकलगार, रवींद्र आडके, मकरंद क्षीरसागर, विक्रम महाडिक, संतोष नलवडे, अक्षय जाधव, सूरज जाधव, शिवराज अडसुळे यांनी रक्तदान केले.
फोटो : १६ कडेगाव १
अेाळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवानेते डॉ. जितेश कदम, डॉ. सुधीर डुबल, डॉ. महेश चव्हाण, डॉ. अशपाक मुल्ला, डॉ. अरुण दाईंगडे, डॉ. संचित कोळी यांच्या उपस्थितीत झाले.