शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

फाळकुटदादांची शिरजोरी वाढली

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

इस्लामपुरातील स्थिती : राजकीय गुंडांच्या दबावाखाली पोलीस

इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात फाळकुटदादांची शिरजोरी वाढली आहे. या गुंडांना राजकीय गुंड खतपाणी घालत आहेत. त्यामुळे शहरात खंडणी, धमकावणे, भूखंड हडप करणे यामध्ये काही गुंड माहीर झाले आहेत. त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. पोलीसच राजकीय गुंडांच्या दबावाखाली असल्याचे चित्र आहे.वारणा-कृष्णा खोऱ्यात वसलेल्या वाळवा तालुक्यात राजकीय गुंड चांगलेच फोफावले आहेत. वाळू माफिया, खासगी सावकारी आणि बिल्डरच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक होत आहे. या सर्वच माफियांनी पैशाच्या जोरावर आणि धाबा संस्कृतीने या फुटकळ गुंडांच्या अंगावर मास चढले आहे. यामुळे हे गुंड सर्रासपणे गावठी कट्टे व बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करीत आहेत.हे गुंड पोलिसांसमोरच वावरताना दिसतात. त्यांच्यावर कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही. या तालुक्यातील आष्टा, कुरळप, कासेगाव या पोलीस ठाण्यांची अशीच परिस्थिती आहे. इस्लामपूर पोलीस ठाणे म्हणजे आर्थिक घडामोडींचे केंद्रच बनले आहे. या घडामोडीत काही अधिकाऱ्यांवर लाचलुचपत खात्याने कारवाईही केली आहे. तरीसुध्दा महसूल, नगरपरिषद आणि पोलीस खात्यात भ्रष्टाचार फोफावला असून, यामध्ये राजकीय नेत्यांचे सगेसोयरेच आहेत.इस्लामपूर बसस्थानकाचा परिसर गुंडांचा केंद्रबिंदू आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १२ या वेळेत ग्रामीण भागातून येणाऱ्या महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करण्यात हे गुंड आघाडीवर असून, त्यांना महाविद्यालयीन युवकांची साथ मिळत आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस आंबेडकर मार्गावरच हे युवक गुंडांना घेऊन वावरताना दिसतात. मध्यंतरीच्या काळात खासगी वेशातील पोलिसांनी अशा गुंडांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले होते. सध्या मात्र ही कारवाई थंडावल्याने पुन्हा मागचे दिवस आले आहेत.गेल्या ५ वर्षांपासून इस्लामपूर पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी भेटलेला नाही. जे जे अधिकारी आले ते ते मंत्र्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनूनच राहिले. याच पुढाऱ्यांचे बगलबच्चे गुंडगिरी, खासगी सावकारी, बेकायदेशीर उद्योग करण्यात माहीर झाल्याने या तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. (प्रतिनिधी)छेडछाडीला ऊतइस्लामपूर बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाडीला ऊत आला आहे. पोलिसांनी मध्यंतरी कारवाई केली. त्यानंतर मात्र पोलीसही हतबल झाले आहेत.