शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एसपी, डीवायएसपींची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक सांगलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:41 IST

सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे याच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी शनिवारी जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे व पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे शनिवारी सीआयडीपुढे हजर

ठळक मुद्देकामटेसह संशयितांच्या घरांवर छापे तासाभराने पुन्हा ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले.

सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे याच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी शनिवारी जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे व पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे शनिवारी सीआयडीपुढे हजर झाले. पुणे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत चौकशीचे काम सुरू होते.दरम्यान, सीआयडीने बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांच्या घरांवर छापे टाकून झडती सुरू केली आहे.

सांगली शहर पोलिसांनी दि. ५ रोजी लुटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला नग्न करून उलटे टांगून बेदम मारहाण केली होती. त्याचे तोंड पाण्याने भरलेल्या बादलीत बुडविल्याने तो मृत झाला. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी त्याचा मृतदेह दि. ६ रोजी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात नेऊन जाळला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले अटकेत आहेत. या गुन्'ाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी सुनील रामानंद शुक्रवारी रात्री सांगलीत दाखल झाले. शनिवारी सकाळी ते सीआयडी कार्यालयात आले. अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला.

सकाळी अकरा वाजता ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. ज्या ‘डीबी’ रूममध्ये अनिकेतला मारले, त्या रूमची त्यांनी पाहणी केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास वापरलेल्या मोटारीची पाहणी केली. त्यानंतर चौकशी व तपासाचा पुढील आढावा घेण्यासाठी ते शहर पोलिस ठाण्यातच थांबले. दुपारी बारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे शहर पोलिस ठाण्यात सीआयडीच्या पथकापुढे हजर झाल्या. अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव करून तशी फिर्याद कामटेने दाखल केली होती. हा गुन्हा घडल्यापासून खरा प्रकार उघडकीस येईपर्यंत पोलिसांनी काय तपास केला, याचा उलगडा कसा झाला, अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला लुटमारीच्या गुन्'ात अटक कधी केली, लुटमारीच्या गुन्'ातील फिर्यादी खरा आहे का, याबद्दल माहिती घेतली. दुपारी दोन वाजता सुनील रामानंद शहर पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत दीपाली काळेही बाहेर पडल्या. त्यानंतर तासाभराने पुन्हा ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले.अनिकेतच्या भावांचा जबाबसीआयडीने शनिवारी मृत अनिकेत कोथळेचे भाऊ आशिष व अमित कोथळे यांचा जबाब नोंदवून घेतला. अनिकेतला अटक केल्यापासून त्याच्या घातपातापर्यंत जी माहिती स्थानिक पोलिसांनी त्यांना दिली, त्याबद्दल विचारणा करण्यात आली.