शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या दूध आंदोलनाची ठिणगी; केदारवाडीजवळ टँकर फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:23 IST

इस्लामपूर/कासेगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) फाट्यावर रविवारी दूध आंदोलनाची ठिणगी पडली. सायंकाळी पाच वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले.दूध उत्पादकांना थेट पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवार, दि. १६ जुलैपासून राज्यभर ‘दूध ...

इस्लामपूर/कासेगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) फाट्यावर रविवारी दूध आंदोलनाची ठिणगी पडली. सायंकाळी पाच वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले.दूध उत्पादकांना थेट पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवार, दि. १६ जुलैपासून राज्यभर ‘दूध बंद’ आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र रविवारीच केदारवाडी फाट्यावर या आंदोलनाची झलक पाहण्यास मिळाली.बंगळूरहून आंबेगाव येथील गोवर्धन दूध डेअरीला दूध पुरवठा करण्यासाठी निघालेला टॅॅँकर (क्र. एमएच १६, सी ६९९९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविला. किणीपासून कार्यकर्ते या टॅँकरचा पाठलाग करीत होते. केदारवाडीजवळ त्यांनी चालकाला थांबण्यास भाग पाडले. टॅँकरच्या समोरील बाजूच्या काचा फोडल्या. टँकरच्या मागील बाजूचे व्हॉल्व्ह उघडून टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले. घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. टॅँकर ताब्यात घेऊन कासेगाव पोलीस ठाण्यात आणून उभा केला. याबाबत चालक विलास किसन कोठावळे (रा. निगुज, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.शेट्टींची पोलिसांशी बाचाबाचीरविवारी दुपारी खासदार राजू शेट्टी कºहाड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी निघाले होते. यावेळी महामार्गावर उभ्या असलेल्या एका दूध वाहतूक करणाऱ्या टॅँकरचालकाला अडवून पोलीस चौकशी करीत होते. खासदार राजू शेट्टी यांनी तेथे थांबून, नेमके काय सुरू आहे, याची माहिती घेतली. यावेळी शेट्टी व पोलिसांची बाचाबाची झाली. यानंतर शेट्टी कºहाडकडे रवाना झाले. गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाºयांनी कºहाड येथे शेट्टी यांची दिलगिरी व्यक्त केली.गावोगावी बैठकाआंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच दूध उत्पादक शेतकºयांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. गाईच्या दुधाचा खरेदी दर वाढवावा व शेतकºयांना थेट ५ रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी पुकारलेल्या दूध आंदोलनामुळे तालुक्यातील दूध डेअरीला जाणारच नसल्याचे बोलले जात आहे.