शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
8
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
9
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
10
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
11
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
12
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
13
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
14
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
15
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
16
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
17
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
18
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
19
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
20
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

दक्षिण महाराष्ट्र बनावट नोटांचा केंद्रबिंदू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:00 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देण्याचा उद्योग अजूनही सुरूच आहे. गेल्या पंधरा वर्षांत सांगली, कोल्हापूर व सातारा हे तीन जिल्हे बनावट नोटांच्या छपाईचे केंद्रबिंदूच ठरले आहेत. या नोटांची छपाई व तस्करीची पाळेमुळे परराज्यात पोहोचली आहेत. ‘रॅकेट’ची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी अनेकदा हात घातला. पण तपास अर्धवट राहत असल्यामुळे तस्करांकडून नोटांचा काळाबाजार ‘सुसाट’ सुरू आहे.कोल्हापुरातील गांधीनगर पोलिसांंना शनिवारी बनावट नोटांचे प्रकरण हाती लागले. त्याचे ‘कनेक्शन’ सांगली निघाले. गांधीनगर पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी येथे छापा टाकला. तत्पूर्वी सहा महिन्यांपूर्वी सांगलीत बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाºया चौघांच्या टोळीला शहर पोलिसांनी पकडले. मुंबई, पश्चिम बंगालपर्यंत तपास गेला; पण ‘बडे मोहरे’ हाताला लागलेच नाहीत. तपास अर्ध्यावरच थांबला. कºहाड (जि. सातारा) येथेही दोन महिन्यांपूर्वी बनावट नोटा चलनात आणताना दोघे सापडले. चार दिवसांपूर्वी सांगलीत संजयनगरच्या आठवडा बाजारात दोनशेच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. गेल्या पंधरा वर्षांत सातत्याने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार सुरूच राहिला आहे. पोलिसांनी कित्येकदा कारवाई केली, तस्कर, एजंटांच्या मुसक्या आवळल्या; पण कायद्यातील पळवाटांचा आधार घेत संशयित सहीसलामत बाहेर सुटले.बनावट नोटांच्या छपाईसाठी प्रिंटर, स्कॅनर, कागदांची बंडले, संगणक ही सामग्री अवघ्या ५० ते ६० हजारात खरेदी केली जाते. दोनशे, पाचशे व दोन हजाराच्या नोटांची हुबेहूब छपाई केली जाते. या नोटा चलनात आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली जाते. यासाठी त्यांना घसघशीत कमिशन दिले जाते. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी या नोटा खपविण्यात टोळीचा हातखंडा आहे. केंद्र शासनाने दोनशे, पाचशे व दोन हजाराच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या नोटेचा कागद अत्यंत हलका आहे. बनावट व खरी अशा दोन नोटा जवळ ठेवल्या तर त्या ओळखणे शक्य होत नाही. याचाच फायदा उठवित टोळीने नोटांच्या छपाईचा उद्योग जोमाने सुरू केला आहे. एक टोळी हाताला लागली तरी, दुसºया टोळीकडून नोटांची छपाई सुरूच असते. त्यामुळे बनावट नोटांची छपाई करणाºया टोळ्या आहेत तरी किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अनेक प्रकरणे उजेडात : एकालाच जन्मठेपस्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी कुपवाडमध्ये बनावट नोटांची छपाई करण्यास आलेल्या ओगलेवाडी (ता. कºहाड) येथील बळीराम कांबळे यास पकडले होते. त्याने ओगलेवाडीत नोटांच्या छपाईचा कारखाना असल्याचे सांगितले. तिथे छापा टाकून शंभर, पाचशे व हजाराच्या लाखो रुपयांच्या नोटा जप्त केल्या. हा तपास मुळापर्यंत गेला. बळीराम कांबळे यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तत्कालीन अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील भगतसिंग राजपूत यांनी याचे काम पाहिले होते. याचा अपवाद सोडला तर, अन्य कोणत्याही प्रकरणात संशयितांना शिक्षा झालेली नाही.