आ. सावंत म्हणाले, संख, डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वत:च्या स्थानिक विकास फंडातून, तर उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा नियोजन समितीतून व माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाला आ. मोहनराव कदम यांच्या आमदार फंडातून रुग्णवाहिका मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी प्रस्ताव दिला आहे. निविदा काढली जाणार आहे.
ते म्हणाले की, कोरोना काळात आरोग्य केंद्रे प्रभावी कामगिरी करीत आहेत. रुग्णवाहिका नसल्याने अतितातडीच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खासगी वाहने घ्यावी लागत आहेत. आता या केंद्रांना सुसज्ज रुग्णवाहिका मिळणार आहेत.
संख प्राथमिक आरोग्य केंद्राला २००८मध्ये आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. सुसज्ज इमारत आहे. आरोग्य केंद्रात १६ गावे समाविष्ट आहेत.
परंतु रुग्णवाहिका नाही. १०८ रुग्णवाहिका डॉक्टरअभावी पाच महिन्यांपासून बंद आहे.
डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ गावे, उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात १४ गावे समाविष्ट आहेत. या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळणार आहेत.