साखराळे येथे अर्कशाळा विस्तारिकरण कामाचे भूमिपूजन अध्यक्ष पी. आर. पाटील, रत्नकांता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विजयराव पाटील, विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, सुवर्णा पाटील, आर. डी. माहुली, धैर्यशील पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : अनेक संकटांनी अडचणीत आलेल्या साखर उद्योगासमोर इथेनॉल निर्मिती हा आशेचा किरण असल्याचे मत राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
साखराळे युनिटमधील अर्कशाळा (डिस्टिलरी) विस्तारिकरण कामाचे भूमिपूजन पी. आर. पाटील, रत्नकांता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, दिलीपराव पाटील, एल. बी. माळी, बाळासाहेब पवार, आनंदराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, अर्कशाळा व्यवस्थापक धैर्यशील पाटील उपस्थित होते.
पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदशनाखाली साखराळे युनिटमधील अर्कशाळेचे विस्तारिकरण करीत आहोत. पूर्वी प्रतिदिन ७५ हजार लिटर इथेनॉल निर्मिती करीत होतो. आता १ लाख ५० हजार लिटर इथेनॉलची निर्मिती होईल. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये प्रथम ५ टक्के, तर आता १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली होती. २०२३ पर्यंत ती २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीमधून चार पैसे मिळून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्यास मदत होईल. हे विस्तारिकरण काम ऑक्टोबर २१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी स्वागत केले. यावेळी संचालक प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठलराव पाटील, माणिक शेळके, जालिंदर कांबळे, सुवर्णा पाटील, मुख्य अभियंता विजय मोरे, सुनील सावंत, प्रेमनाथ कमलाकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले.