रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे रुग्णालयांना जीवनावश्यक उपकरणे देण्यात आली. यावेळी संग्राम पाटील, डॉ. सुधीर ननंदकर, राजेंद्र लंबे आदी उपस्थित होते.
-
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उपचारासाठी अतिदक्षता विभागात किंवा वॉर्डात दाखल असणाऱ्या नवजात शिशूंची सोनोग्राफी आता जागेवरच करता येणार आहे. यापूर्वी शिशूंना सोनोग्राफीसाठी बाहेर न्यावे लागायचे. रोटरी क्लब ऑफ सांगली मिटडाऊनने शासकीय रुग्णालयाला प्रदान केलेल्या उपकरणांमुळे हे शक्य झाले.
अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर यांनी ही उपकरणे स्वीकारली. यावेळी प्रांतपाल संग्राम पाटील, माजी प्रांतपाल डॉ. मसूरकर, ॲड. किशोर लुल्ला, अध्यक्ष राजेंद्र लंबे, सचिन धर्मेंद्र खिलारे, मल्लिकार्जुन बड्डे आदी उपस्थित होते.
रोटरीतर्फे बामणोली येथील विवेकानंद रुग्णालयातही औद्योगिक कामगारांच्या तपासणीसाठी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली. डॉ. राम लाडे यांनी ती स्वीकारली. डॉ. ननंदकर यांनी रोटरीच्या उपक्रमाचे स्वागत केले. सामाजिक दातृत्वातूनच सिव्हिलमध्ये अधिकाधिक रुग्णांना चांगली सेवा देणे शक्य झाल्याचे ते म्हणाले.
संग्राम पाटील म्हणाले, आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी रोटरीने नेहमीच मदतीचा हात दिला आहे.
यावेळी सचिन शहा, अनुजा कुलकर्णी हेदेखील उपस्थित होते.
----------------