शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जुनी मोटार नवी भासवून तासगावच्या ग्राहकाला विकली; सहा लाखांची भरपाई देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

By संतोष भिसे | Updated: March 29, 2024 17:41 IST

सांगली : जुनी मोटार नवीन असल्याचे भासवून विकत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल प्रकाश ऑटो प्रा. लि. उल्हासनगर (जि. ठाणे) यांनी ...

सांगली : जुनी मोटार नवीन असल्याचे भासवून विकत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल प्रकाश ऑटो प्रा. लि. उल्हासनगर (जि. ठाणे) यांनी ग्राहकाला ६ लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश येथील ग्राहक मंचाने दिले.तासगाव येथील अमोल अशोक भंडारे हे उल्हासनगर येथे राहण्यास होते. त्यांनी प्रकाश ऑटोमधून २०१५ मध्ये मोटार खरेदी केली होती. त्यासाठी ४ लाख ५३ हजार २९२ रुपये भरले होते. गाडी घेतल्यानंतर तिला पिकअप नाही, मायलेज मिळत नाही, गाडीची कार्यक्षमता चांगली नाही या गोष्टी लक्षात आल्या. याबाबत भंडारे यांनी प्रकाश ऑटोकडे तक्रारी केल्या असता तुमची गाडी नवीन आहे. पिकअप यायला वेळ लागेल अशी कारणे सांगण्यात आली. या काळात गाडी दुरुस्तीसाठी त्यांनी दोन लाख रुपये खर्च केले.यादरम्यान कोरोनामुळे भंडारे उल्हासनगर येथून मूळ गावी तासगावला आले. पैशांची गरज असल्याने गाडी विकण्याचे ठरविले. सांगली येथे मोटार कंपनीच्या शोरुममध्ये गाडी दाखविली असता २०१५ मध्ये तिचा अपघात झाल्याचे वितरकाने सांगितले. भंडारे यांनी गाडी खरेदी करण्यापूर्वी म्हणजे मे २०१५ मध्ये अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी सांगली येथील ग्राहक मंचाकडे प्रकाश ऑटोविरुद्ध तक्रार दाखल केली.

३० दिवसांत ६ लाख रुपये द्याप्रकाश ऑटो यांनी ग्राहकाला सदोष सेवा दिल्याचे सुनावणीदरम्यान शाबित झाले. भंडारे यांनी गाडीसाठी भरलेले ४ लाख ५३ हजार २९२ रुपये व त्यावर नऊ टक्के दराने व्याज, गाडी दुरुस्तीसाठीचा खर्च म्हणून ५० हजार रुपये तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल एक लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. सुमारे सहा लाख रुपयांची ही भरपाई ३० दिवसांत देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष प्रमोद गोकुळ गिरीगोस्वामी व सदस्य  अशफाक नायकवडी, मनीषा वनमोरे यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी