शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

सांगलीत कोरोना उपचारांसाठी आतापर्यंत तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:32 IST

संतोष भिसे सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारांसाठी रुग्णांना आजवर तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च सोसावा लागला आहे. ही ...

ठळक मुद्देसांगलीत कोरोना उपचारांसाठी आतापर्यंत तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च२३ लाख परत करण्याचे आदेश

संतोष भिसेसांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारांसाठी रुग्णांना आजवर तब्बल २९ कोटी रुपयांचा खर्च सोसावा लागला आहे. ही लाट जिल्ह्यासाठी अत्यंत महागडी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबातील सदस्याला गमावण्याचे दु:ख तर प्रचंड आहेच, शिवाय उपचारांच्या खर्चामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर येत आहेत.शासकीय रुग्णालयात विनाशुल्क बेड उपलब्ध नाहीत, आणि खासगी रुग्णालयांचा दोन-तीन लाखांचा खर्च परवडण्यापलीकडे आहे. त्यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयांत न जाता घरातच उपचार घेत आहेत, त्यातून कोरोनाचे बळीही ठरत आहेत. खासगी कोविड रुग्णालयांनी १ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेत ६ हजार ११८ रुग्णांवर उपचार केले, त्यासाठी २९ कोटी ९ लाख २९ हजार रुपये ७९५ रुपये खर्च घेतला. त्यामुळे कोरोनाचे उपचार गरिबांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा फुले योजनेतून उपचार मोफत असले तरी त्यातून पुरेसे बेड उपलब्ध होत नाहीत परिणामी गरिबांना आयुष्यभराची पुंजी कोरोनासाठी खर्ची टाकावी लागत आहे.ऑडिटमुळे राहतेय नियंत्रणसर्व खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे ऑडिट जिल्हा प्रशासन करते. जिल्हा कोषागार कार्यालयाने त्यावर काटेकोर नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे मनमानी बिल आकारणीला शह बसला आहे. अतिदक्षता विभाग, ऑक्सिजनचा वापर, रेमडेसिविर इंजेक्शन्स आदी प्रत्येक उपचारासाठी शासनाने दर निश्चित करुन दिले आहेत. त्यापेक्षा जास्त बिलांची आकारणी होऊ नये यावर कोषागार कार्यालयाचे बारीक लक्ष आहे. त्यामुळेच बिले अद्याप नियंत्रणात आहेत.२३ लाख परत करण्याचे आदेशकोषागार कार्यालयाच्या तपासणीमध्ये २०६ बिलांमध्ये जादा खर्च आकारल्याचे दिसून आले. ११० रुग्णांकडून २३ लाख २० हजार ५६२ रुपये जादा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाच रुग्णालयांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर रुग्णालयांनी १२ लाख १४ हजार ५८५ रुपये परत केले आहेत. अद्याप १० लाख ६३ हजार ११७ रुपये रुग्णांना परत मिळायचे आहेत.१ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेचा खर्च असा

  • खासगी कोविड रुग्णालये - ६७
  • उपचार घेतलेले एकूण रुग्ण - ६,११८
  • रुग्णांनी भरलेली बिले - २९ कोटी ९ लाख २९ हजार ७९५ रुपये
  •  ८ दिवसांपेक्षा जास्त काळ ॲडमिट रुग्ण - ४१४
  • प्रत्येक रुग्णाचा सरासरी खर्च - ४७ हजार ५५३
  •  मिरजेतील एका खासगी रुग्णालयातील सर्वाधिक रुग्ण - ४८०
  • या रुग्णालयाचे बिलिंग सर्वाधिक - ४ कोटी ३८ लाख १७ हजार ६१३
  • जादा आकारणी झालेली बिले - २०६
  • परत करावयाची रक्कम २३ लाख २० हजार ५६२ रुपये
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली