शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Sangli: मिरजेतील स्नेहा ठरली कुंकुंवाले समाजातील पहिली एमबीबीएस डॉक्टर

By संतोष भिसे | Updated: April 1, 2024 18:11 IST

घर विकून उभारला डॉक्टरकीसाठी पैसा, लेकीच्या स्वप्नांना वडिलांनी दिले पंख 

सांगली : वडिलांचा व्यवसाय स्टेशनरी विकण्याचा. मिळकत जेमतेमच, पण मुलांना शिकविण्याची जिद्द भारी. पोरीला चांगल्या गुणवत्तेमुळे एमबीबीएसला प्रवेश मिळाला, पण पुढील खर्च आवाक्याबाहेरचा होता. त्यासाठी त्यांनी राहते घर विकले, पण परिस्थितीला स्नेहाच्या डॉक्टरकीच्या आड येऊ दिले नाही.राज्यात कुंकुवाले समाजातील पहिली मुलगी डॉक्टर ठरलेल्या स्नेहा चंदनवाले आणि तिचे वडील यल्लाप्पा यांच्या जिद्दीची ही कथा. मिरजेत मंगळवार पेठेत विश्वश्री चौकात चंदनवाले कुटुंब भाड्याच्या घरात राहते. दोन मुली, एक मुलगा असा चंदनवाले दांपत्याचा संसार. थोरल्या स्नेहाने बारावीला ७८ टक्के गुण मिळविल्यानंतर नीटमध्येही बाजी मारली. चांगल्या गुणांमुळे मुंबईच्या कुपर वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय शुल्कात प्रवेश मिळाला. प्रवेशाला फार पैशांची गरज नसली, तरी पुढील शिक्षण, मुंबईत राहणे हा खर्च मोठा होता.हातावरचे पोट असलेल्या यल्लाप्पा यांनी हार मानली नाही. दैवाने लेकीच्या पदरात टाकलेले दान व्यर्थ जाऊ नये यासाठी कंबर कसली. राहते घर विकले. स्नेहाच्या डॉक्टरकीसाठी पैसा उभा केला. तिनेही वडिलांच्या आकांक्षा संपूर्ण सुफळ केल्या. चांगल्या गुणांसह एमबीबीएस उत्तीर्ण झाली. कुंकुवाले समाजात एमबीबीएस डॉक्टर झालेली ती पहिलीच मुलगी असल्याचा दावा यल्लाप्पा यांनी केला. आता स्नेहाला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे. आहे. त्यासाठीही मागे हटणार नसल्याचे ते सांगतात. थोरल्या स्नेहाच्या पावलावर पाऊल टाकत धाकटी श्रुतीदेखील दंतवैद्य होत आहे. बुधगाव येथे डेन्टल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मुलगा अकरावीत आहे. तिघांच्या शिक्षणाचा खर्च मोठा असला, तरी शिक्षणाशिवाय कुटुंबाला भविष्य नाही हे यल्लाप्पा यांच्या लक्षात आले आहे. 

जिजाऊ ट्रस्टतर्फे गाैरवमिरजेत जिजाऊ चॅरीटेबल ट्रस्टने रविवारी स्नेहा आणि यल्लाप्पा यांच्यासह चंदनवाले कुटुंबाचा सत्कार केला. भाड्याचे घर इतके छोटे, की सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांना बसायलादेखील पुरेशी जागा नव्हती. पण या छोट्या कुटुंबानेच आभाळाएवढे यश मिळविल्याचा गौरव ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, धनंजय सातपुते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर