शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे होणार मोजमाप, आयुक्तांनी दिले आदेश 

By शीतल पाटील | Updated: August 22, 2023 17:48 IST

येत्या सोमवारपासून सुरूवात

सांगली : महापालिका क्षेत्रातील घोषित झोपडपट्ट्यांचे येत्या सोमवारपासून मोजमाप होणार आहे. तसा निर्णय आयुक्त सुनील पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन समितीसोबतच्या बैठकीत घेतला. याबाबतचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले.झोपडपट्टी पुनर्वसन समितीसोबत आयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे, सहायक संचालक नगररचना विनय झगडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगर अभियंता भगवान पांडव, सहायक आयुक्त नितिन शिंदे, समितीचे अध्यक्ष सुजितकुमार काटे, उपाध्यक्ष रवींद्र सदामते , श्रीराम सासणे, सूरज पवार, मोहसीन इनामदार, निर्भय काटे, गिरीश उमदी उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात सहा झोपडपट्ट्यांचे मोजमाप करण्यात येणार आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष मोजमापास सुरुवात करण्याचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी नगररचना विभागाला दिले. यामध्ये संजयनगर पत्रा चाळ, चिंतामणीनगर झोपडपट्टी, गोकुळनगर, भीमनगर, नवीन वसाहत आणि मिरजवाडी या सहा झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. त्यानंतर उर्वरित घोषित झोपडपट्ट्यांचेही मोजमापही केले जाणार आहे.गेल्या २० वर्षांपासून झोपडपट्ट्या कायम करून झोपडी नावावर करून देण्यासाठी पुनर्वसन समिती पाठपुरावा करत आहे. झोपडपट्ट्यांचे मोजमाप झाल्यानंतर त्याचे नकाशे तयार करून त्यांची झोपडीची जागा, संबंधितांच्या नावावर केली जाणार आहे. या निर्णयाचे समितीने स्वागत केले. भाजपाचे जेष्ठ नेते शेखर इनामदार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अभिजित भोसले, संतोष पाटील यांनीही सहकार्याची भूमिका घेतली.

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त