शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सहा वर्षे बिनपगारी, स्वच्छता मोहीम शहरोशहरी; सांगलीतील युवकांचा विश्वविक्रमी उपक्रम 

By अविनाश कोळी | Updated: May 3, 2024 14:18 IST

सांगली : ना कोणाचे अर्थसहाय्य, ना कुठला पगार. तरीही तब्बल ६ वर्षे हातात झाडू घेऊन शहराच्या स्वच्छतेचा अखंड उपक्रम ...

सांगली : ना कोणाचे अर्थसहाय्य, ना कुठला पगार. तरीही तब्बल ६ वर्षे हातात झाडू घेऊन शहराच्या स्वच्छतेचा अखंड उपक्रम सांगलीच्या तरुणांनी राबवून जिल्ह्याच्या सामाजिक कार्याच्या इतिहासात वेगळी नाेंद केली.निर्धार फौंडेशन नावाने संघटना स्थापन करुन सांगलीच्या काही तरुणांनी हाती झाडू, खोरे, पाट्या घेऊन स्वच्छतेचा वसा घेतला. सांगली शहरात १ मे २०१८ त्यांनी स्वच्छता अभियानास सुरुवात केली. या अभियानास यंदाच्या महाराष्ट्र दिनी ६ वर्ष म्हणजेच २ हजार १९१ दिवस पूर्ण झाले. नागरिकांच्या मनात स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने कोणत्याही अपेक्षेविना निर्धार फौंडेशनचे सर्व युवक कार्यरत आहेत. रस्ते, चौक, उद्याने, दुभाजक, बस थांबे, स्मशानभूमी, नदीघाट अशा एक अनेक ठिकाणांचा कायापालट करीत शहर अन् गावांना त्यांनी सजविले.

एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी मोहीम राबविली. अभियानास २ हजार दिवस पूर्ण होताच इंडियाज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना प्रमाणपत्र दिले. विश्वविक्रमानंतरही त्यांचे हात थांबले नाहीत. स्वच्छतेचे त्यांचे व्रत सुरुच आहे.

आयुक्तांचाही मोहिमेत सहभागमहापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्थानिक स्वच्छतादूतांसमवेत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवित श्रमदान केले. यावेळी कॉलेज कॉर्नर परिसरातील वाढलेले तण, कचरा हटवून दुभाजकासभोवतीची माती काढली. दुभाजकात नवीन रोपे लावून रंगरंगोटी करण्यात आली. यावेळी सांगली शहर पोलिस निरीक्षक तेजश्री पाटील, भरतकुमार पाटील, वृषभ अकिवाटे, सचिन जगदाळे, गुराण्णा बगले, अनिल अंकलखोपे, सुरज कोळी, अनिरुद्ध कुंभार, सतिश कट्टीमणी, गणेश चलवादे, मनोज नाटेकर, समीक्षा मडीवाळ, भाग्यश्री दिवाळकर, शकील मुल्ला उपस्थित होते.

एकाचवेळी दहा जिल्ह्यात मोहीमउपक्रमास सहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, रायगड, मुंबई आदी जिल्ह्यातही एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टॅग्स :Sangliसांगली