इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. शहरातील ५ हजार ८८१ बालकांना लसीकरण करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पाटील, अधिष्ठाता डॉ. एन. आर. देशमुख, डॉ. अशोक शेंडे, डॉ. राणोजी शिंदे उपस्थित होते, तर कासेगाव येथे जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने सभापती शुभांगी पाटील, जि. प. सदस्या संगीता पाटील यांच्या हस्ते लसीकरणाचा प्रारंभ झाला. तालुक्यातील २७ हजार बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यात आली.
फोटो - ३१०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर पोलिओ न्यूज
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी डॉ. एन. आर. देशमुख उपस्थित होते.